Type Here to Get Search Results !

पत्रकार सुरक्षा समिती मोहोळ तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी वजीर मुलाणी यांची नियुक्ती.




सोलापूर (प्रतिनिधी) गेल्या आठ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती राज्यातील पत्रकारांसाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्र व्यवहार करून पाठपुरावा करत असून पत्रकार सुरक्षा समिती च्या माध्यमातून जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना आरोग्य योजना विमा योजना पत्रकारांसाठी घरकुल योजना ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बसमधून मोफत प्रवास पत्रकारांच्या चारचाकी वाहनास टोल मधून सूट राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय जाहिराती यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्राना पूर्वी प्रमाणे जाहिराती खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल प्रकरणी वरिष्ठ अधिकारी मार्फत स्वतंत्र चौकशी पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण या सह राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती आक्रमक व प्रभावीपणे काम करत असून पत्रकार सुरक्षा समितीच्या मोहोळ तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी वजीर मुलाणी यांची नियुक्ती केल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी दिली आहे 

मोहोळ तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी वजीर मुलाणी यांची निवड झाल्याने जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार सरचिटणीस बंडू तोडकर मोहोळ तालुका अध्यक्ष सागर पवार कार्याध्यक्ष सूरज जगताप सचिव शहाजी शिंदे संघटक महादेव शेवाळे खजिनदार प्रवीण फराटे समन्वयक कैलास सूळ सदस्य समाधान गोडसे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचा 6 जानेवारी रोजी सोलापूर येथील समाज कल्याण केंद्र या ठिकाणी ओळख पत्र नियुक्ती पत्र शाल व पुष्पगुछ देऊन सन्मान केला जाणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.