Type Here to Get Search Results !

पत्रकार सुरक्षा समिती सातारा जिल्हा अध्यक्ष पदी कार्यसम्राट न्यूज चे युवा पत्रकार विक्रम वाघमारे यांची फेर निवड.




सोलापूर (प्रतिनिधी) गेल्या आठ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती राज्यातील पत्रकारांसाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्र व्यवहार करून पाठपुरावा करत असून पत्रकार सुरक्षा समिती च्या माध्यमातून जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना आरोग्य योजना विमा योजना पत्रकारांसाठी घरकुल योजना ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बसमधून मोफत प्रवास पत्रकारांच्या चारचाकी वाहनास टोल मधून सूट राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय जाहिराती यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्राना पूर्वी प्रमाणे जाहिराती खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल प्रकरणी वरिष्ठ अधिकारी मार्फत स्वतंत्र चौकशी पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण या सह राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती आक्रमक व प्रभावीपणे काम करत असून पत्रकार सुरक्षा समितीच्या सातारा जिल्हा अध्यक्ष पदी कार्यसम्राट न्यूज चे युवा पत्रकार विक्रम वाघमारे यांची फेर निवड केली असून लवकरच त्यांचा ओळख पत्र नियुक्ती पत्र शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करणार असल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद भैस पश्चिम महाराष्ट्र संघटक मिर्झा गालिब मुजावर पश्चिम पश्चिम महाराष्ट्र उपसंघटक शंकर माने पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष झाकीर शेख सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे जिल्हा कार्याध्यक्ष अतुल भडंगे जिल्हा सचिव अंबादास गज्जम जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार सरचिटणीस बंडू तोडकर दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष अमित राठोड सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी कार्यकारी शहर अध्यक्ष वसीम राजा बागवान कार्याध्यक्ष राजू वग्गू समन्वयक लक्ष्मण सुरवसे प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी यांनी दिली आहे 


*युवा पत्रकार विक्रम वाघमारे यांचा अल्प परिचय*

 युवा पत्रकार विक्रम वाघमारे हे साप्ताहिक कार्यसम्राट या वृत्तपत्राचे तसेच कार्यसम्राट न्यूज या ऑनलाईन पोर्टल चे फलटण तालुका प्रतिनिधी म्हणून अनेक वर्षांपासून काम पहात असून त्यांना सामाजिक कार्यात तसेच पत्रकारिता मध्ये आवड असून त्यांनी पत्रकारिता बरोबरच अनेक सामाजिक कार्यात सहभाग घेतला आहे असून ते सर्वसामान्य माणसाच्या अडचणीत धावून त्यांना मदत करतात शांत संयमी व नेहमी हसतमुख असणाऱ्यां विक्रम वाघमारे यांनी साप्ताहिक कार्यसम्राट या वृत्तपत्रा च्या माध्यमातून जनतेचे प्रश्न प्रशासन दरबारात मांडून त्यांची कामे मार्गी लावण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात त्यांच्या कामाची दखल घेऊन पत्रकार सुरक्षा समितीने त्यांची सातारा जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी पुन्हा दिली आहे युवा पत्रकार विक्रम वाघमारे यांची पत्रकार सुरक्षा समिती च्या सातारा जिल्हा अध्यक्ष पदी फेर नियुक्ती झाल्याने त्यांचे कौतुक होत असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.