सोलापूर (प्रतिनिधी) सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे एकूण १९२ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम मंगळवारपासून (ता. २३) अशोक चौक येथील संपर्क कार्यालयात होणार आहे. लवकरच शिवविकास आराखडा जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख प्रा. अजय दासरी यांनी दिली.
पक्षाच्या वतीने मागील दीड वर्षापासून प्रत्येक प्रभागात संपर्क अभियान राबविण्यात आले आहे. लवकरच शिवविकास आराखडा जाहीर करण्यात येणार आहे. त्याचा टीझरही लवकरच जाहीर होईल. सोलापूर
*खैरे व कोकीळविरोधात करणार 'आत्मक्लेष*
यावेळी प्रा. दासरी यांनी स्वपक्षीय नेत्यांवरच निशाणा साधला. पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे आणि अनिल कोकीळ यांनी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत या नेत्यांनी योग्य समन्वय साधला नाही आणि ते ग्रामीण भागात फिरले नाहीत. त्यामुळे पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. तसेच, 'एबी फॉर्म' देखील वेळेत उपलब्ध करून दिले नसल्याचा ठपका त्यांनी ठेवला. नेत्यांच्या कार्यपद्धतीचा निषेध म्हणून आपण 'आत्मक्लेष आंदोलन' करणार असल्याचेही दासरी यांनी जाहीर केले.
महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता पूर्णपणेऍक्शन मोडमध्ये आला आहे.
जिल्हाप्रमुख प्रा. अजय दासरी यांनी स्पष्ट केले की, भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब
ठाकरे पक्ष हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार आहे. आघाडीच्या चर्चेत शिवसेनेने ५४ जागांची मागणी केली आहे. गेल्या दीड वर्षापासून पक्षाने प्रत्येक प्रभागात संपर्क अभियान राबवून आपली ताकद वाढवली आहे. प्रत्येक प्रभागापर्यंत
पक्षाचे विचार पोहोचवणे हा आमचा मुख्य संकल्प आहे. महाविकास आघाडीत एमआयएम पक्षाचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही; यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो आदेश देतील, तोच अंतिम असेल, असेही त्यांनी नमूद केले. शहराच्या विकासाचे व्हिजन मांडणारा 'शिवविकास आराखडा' लवकरच जनतेसमोर आणला जाईल. त्यातून शिवसेनेचे शहराच्या विकासाचे धोरण स्पष्ट केले जाईल, असेही दासरी यांनी स्पष्ट केले असून शिवसेनेमधील वाद काही केल्या मिटण्याची चिन्हे दिसेनात असंच हल्ली दिसतंय
पत्रकार परिषदेला रवींद्र नागणकेरी, नाना मोरे, दत्ता गणेशकर, शशिकांत बिराजदार, रमेश चौगुले, विठ्ठल उपर्लप, सुरेश शिंदे, सुशील उपलप, पंकज गजाकोश यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
