Type Here to Get Search Results !

नवीन विडी घरकुल मधील बेकायदेशीर गँस पॉईंट बंद करा पत्रकार अमोल कुलकर्णी यांचे सोमवार पासून बेमुदत धरणे आंदोलन वळसंग पोलीस ठाणे येणार प्रकाश झोतात

 


सोलापूर (प्रतिनिधी )गोदूताई नवीन विडी घरकुल पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये काही उपनगरात रिक्षामध्ये बेकायदेशीरित्या घरगुती गॅस भरण्यासाठी काही ठिकाणी बेकायदेशीर गॅस पॉइंटअसून दिवसा व रात्री या भागातील रिक्षांना या गॅस पॉईंट वरून बेकायदेशीर रित्या रिक्षात गॅस भरला जात असून सदरची बाब अतिशय गंभीर व चिंताजनक असून नागरी वसाहतीमध्ये अशा पद्धतीने अवैधरित्या रिक्षात गॅस भरणे अतिशय धोकादायक असून एखादी अप्रिय घटना घडली किंवा गॅस चा स्फोट झाल्यास जीवित व वीत्त हानी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता दाट असून अशा बेकायदेशीर गॅस पॉईंट मुळे या परिसरातील नागरिकांच्या जिवीताला मोठा धोका निर्माण झाला नवीन विडी घरकुल पोलीस चौकीच्या हद्दीतील बेकायदेशीर रित्या सुरू असलेल्या गॅस पॉईंट चालकावर कारवाई करून या भागातील बेकायदेशीररित्या रिक्षात गॅस भरणारे गॅस पॉईंट कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत म्हणून पत्रकार अमोल कुलकर्णी यांनी दिनांक 6/12/2025 रोजी मा पोलीस अधीक्षक सोलापूर यांच्याकडे लेखी स्वरूपाची तक्रार दाखल केली होती परंतु पत्रकार अमोल कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारी वरून वळसंग पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याचा गंभीर आरोप पत्रकार अमोल कुलकर्णी यांनी केला असून नवीन विडी घरकुल परिसरातील बेकायदेशीर रित्या सुरु असलेल्या गॅस पॉईंटवर वळसंग पोलीस कारवाई करत नसल्याने अखेर सोमवार दिनांक 22/12 2025 पासून आंदोलन गेट (पूनम गेट ) जिल्हा परिषद समोर फलक लावून बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती पत्रकार अमोल कुलकर्णी यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.