Type Here to Get Search Results !

पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर जिल्हा सचिव पदी युवा संपादक अंबादास गज्जम यांची फेर निवड.





सोलापूर (प्रतिनिधी) गेल्या आठ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती राज्यातील पत्रकारांसाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्र व्यवहार करून पाठपुरावा करत असून पत्रकार सुरक्षा समिती च्या माध्यमातून जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना आरोग्य योजना विमा योजना पत्रकारांसाठी घरकुल योजना ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बसमधून मोफत प्रवास पत्रकारांच्या चारचाकी वाहनास टोल मधून सूट राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय जाहिराती यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्राना पूर्वी प्रमाणे जाहिराती खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल प्रकरणी वरिष्ठ अधिकारी मार्फत स्वतंत्र चौकशी पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण या सह राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती आक्रमक व प्रभावीपणे काम करत असून पत्रकार सुरक्षा समितीच्या सोलापूर जिल्हा सचिव पदी AG न्यूज चे युवा संपादक अंबादास गज्जम यांची फेर निवड केली असून 6 जानेवारी (पत्रकार दिनी ) त्यांचा ओळख पत्र नियुक्ती पत्र शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करणार असल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद भैस पश्चिम महाराष्ट्र संघटक मिर्झा गालिब मुजावर पश्चिम पश्चिम महाराष्ट्र उपसंघटक शंकर माने पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे जिल्हा कार्याध्यक्ष अतुल भडंगे जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार सरचिटणीस बंडू तोडकर सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी कार्यकारी शहर अध्यक्ष वसीम राजा बागवान कार्याध्यक्ष राजू वग्गू प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी यांनी दिली आहे 


*युवा संपादक अंबादास गज्जम यांचा अल्प परिचय*

 युवा संपादक अंबादास गज्जम हे सोलापूर येथील रहिवाशी त्यांना लहान पणापासून पत्रकारिता ची आवड होती त्यांनी पत्रकारिता बरोबरच अनेक सामाजिक कार्यात सहभाग घेतली असून सर्वसामान्य माणसाच्या अडचणीत धावून त्यांना मदत करतात शांत संयमी व नेहमी हसतमुख असणाऱ्यां त्याच बरोबर AG या न्यूज पोर्टल / चॅनल च्या माध्यमातून जनतेचे प्रश्न शासकीय कार्यालयात मांडून त्यांची कामे मार्गी लावणाऱ्या युवा संपादक अंबादास गज्जम यांच्यावर पत्रकार सुरक्षा समितीने सोलापूर जिल्हा सचिव या पदाची पुन्हा जबाबदारी दिली आहे युवा संपादक अंबादास गज्जम यांची पत्रकार सुरक्षा समिती च्या सोलापूर जिल्हा सचिव पदी फेर नियुक्ती झाल्याने त्यांचे कौतुक होत आहे त्याच बरोबर अनेकांनी अभिनंदन देखील केलं आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.