Type Here to Get Search Results !

बेगमपुर येथे माँ बेगंबी साहेब उरूस 2025-26 कार्यक्रमाचे आयोजन




मोहोळ (अमर पवार) दरवर्षीप्रमाणे बेगमपूर येथील ग्रामदैवत असणारे माँ बेगंबी साहेब उरूस मंगळवार दिनांक 30 -12 - 2025 पासून सुरू होत आहे. तरी हा उरूस बेगमपूर येथील सर्व जाती धर्माचे ग्रामस्थ मिळून मोठ्या प्रमाणात साजरा करतात. या उरुसामध्ये आसपासच्या गावातील सर्व नागरिक लहान-मोठे वयस्कर मंडळी सहभागी होत असतात.

*बुधवार 31- 12- 2025.* रोजी सायंकाळी आठ वाजता गावातून कळसाची मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीमध्ये म्युझिकल बँड, घोडे, मोर, व शोभेची दारू आणि पहाटे संदल (गंध) असणार आहेत.

*गुरुवार दि.01-01-2026* रोजी सकाळी 9 वाजता कुरआनखानी व दिवसभर शाहिद अजमेरी अँड निजामी कव्वाली होतील. सायंकाळी 4 वाजता खिचडा महाप्रसादाचे वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे.

*शुक्रवार दि.02-01-2026* रोजी सायंकाळी 4 वाजता कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.