Type Here to Get Search Results !

पत्रकार सुरक्षा समिती बीड जिल्हा अध्यक्ष पदी जेष्ठ पत्रकार वहीदखान पठाण यांची नियुक्ती




सोलापर (प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने गेले आठ वर्षापासून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना, पत्रकारांसाठी विमा योजना, घरकुल योजना, आरोग्य योजना, यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती, राज्यातील युट्युब व वेब पोर्टलला शासकीय मान्यता, ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास, पत्रकारांना टोल माफी, खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांची प्रकरणे निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी, राज्यातील पत्रकारावर होणारे हल्ले , धमकी, मारहाण, तसेच राज्यातील पत्रकारांच्या इतर प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती वतीने आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्र व्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न करणाऱ्या पत्रकार सुरक्षा समितीच्या बीड जिल्हा अध्यक्ष पदी  विविध दैनिक वृत्तपत्रामध्ये काम करत असलेले जेष्ठ व अभ्यासू पत्रकार वहीदखान पठाण यांची नियुक्ती केली असून 


 त्यांना पुढील वाटचालीस प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे  मराठवाडा विभाग अध्यक्ष बाळासाहेब शिंदे कार्याध्यक्ष प्रवीण राठोड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद भैस कार्याध्यक्ष तानाजी माने संघटक मिर्जा गालीब मुजावर सरचिटणीस गणेश कारंडे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे  कार्यकारी जिल्हा अध्यक्ष संतोष म्हेत्रे उपाध्यक्ष अमर पवार  कलीम शेख अशपाक तांबोळी सचिव अंबादास गज्जम कार्याध्यक्ष अतुल भडंगे संघटक सादिक शेख सरचिटणीस बंडू तोडकर सातारा जिल्हा अध्यक्ष विक्रम वाघमारे परभणी जिल्हा अध्यक्ष प्रसाद पोळ धाराशिव जिल्हाध्यक्ष राहुल कोळी रायगड नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राज भंडारी अहिल्या नगर जिल्हाध्यक्ष नंदकुमार बगाडे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.