सोलापूर (प्रतिनिधी) मित्राच्या घरी पतंग उडविण्यासाठी गेल्यावर एका अल्पवयीन मुलाची कपाटातील पैशावर नजर पडली आणि दोघांनी मिळून प्लॅन केला. बाकीचे दोघे त्या घरातील मुलाला पतंग उडविण्याच्या बहाण्याने घराच्या छतावर न्यायचे. दोन-तीन दिवसांत दोघांनी घरातील पाच लाख रुपये लंपास केले होते. काही दिवसांनी ते नवी दुचाकी घ्यायला शोरूमला गेले आणि पोलिसांच्या तावडीत सापडले.
रविवार पेठेतील प्लॉटिंगच्या तरुण व्यावसायिकाच्या घरातून पाच लाख रुपये चोरीला गेले होते. त्यांच्या घरात सतत कोणी ना कोणी कामानिमित्त येत असल्याने घर नेहमीच उघडे
असायचे. ही संधी साधून कोणीतरी रोकड चोरली असावी, असा त्यांचा संशय होता. त्यानुसार त्यांनी जेलरोड पोलिसांत फिर्याद दिली होती. सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने चोरट्याचा शोध सुरू केला होता. त्याचवेळी पोलिस शिपाई साईनाथ गायकवाड, कल्लप्पा देकाणे व संतोष वायदंडे यांना खबऱ्याकडून संशयितांबद्दल माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून दोन अल्पवयीन मुलांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर पैसे चोरल्याची त्यांनी कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चार लाख १० हजार रुपये हस्तगत केले आहेत.
मित्राच्या घरातील पाच लाख रुपये चोरलेल्या दोन अल्पवयीन मुलांचे वागणे बदलले होते. चौघांनी मिळून एकाच रंगाचे कपडे, शूज खरेदी केल होते. एकाने आईसाठी सोन्याचा हा देखील घेतला होता. वीज बिल भरण दरमहा डोईजड असलेल्या कुटुंबाती त्या मुलाचे वागणे काहींना खटकत होते. आता तो नवी कोरी दुचाक आणायला गेला होता. त्यावेळी आणखी संशय वाढला आणि पोलिसांना त्याबद्दल खबर मिळाळी गणेशोत्सवात त्याने हार, वर्गणीस मित्रांना पैसे दिले होते. दररोज ते मित्र चायनीज, बिर्याणी खात होते.12.15 दिवसांत त्या अल्पवयीन मित्रांनी दीड ते दोन लाख रुपये खर्च केले असेही पोलिस सूत्रांनी सांगितले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त पोमण यांच्या मार्गदर्शनखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत पोलीस निरीक्षक भाऊसाहेब बिराजदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील सहाय्यक फौंजदार शरीफ शेख गजानन कीणगिरी भारत गायकवाड एम डी नदाफ वसंत माने धनाजी बाबर अब्दुल वहाब शेख कलप्पा देकाणे संतोष वायदंडे उमेश सावंत साईनाथ वसलवाड विठ्ठल जाधव युवराज गायकवाड यांनी पार पाडली

