सोलापूर (प्रतिनिधी ) जन सामान्य माणसांचा बुलंद आवाज म्हणून गेल्या दहा वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समितीचे मुखपत्र असलेल्या साप्ताहिक कार्यसम्राट च्या दिवाळी विशेष अंकाचे प्रकाशन सिंघम म्हणून ओळखले जाणारे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद माने (साहेब) यांच्या हस्ते पोलीस आयुक्त कार्यालयात करण्यात आले यशवंत पवार जेष्ठ पत्रकार असून समाजातील तळा गाळातील लोकांचे प्रश्न नेहमीच प्रशासन दरबारात मांडताना त्यांना पाहिलं असून वंचित पिढीत घटकांच्या न्याय हक्कासाठी यशवंत पवार यांनी आपली लेखणी पणाला लावून त्यांचे प्रश्न सोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी यावेळी सांगत साप्ताहिक कार्यसम्राट च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
पत्रकारिता एक वसा ध्यास समजून समाजातील वंचित पिढीत अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी साप्ताहिक कार्यसम्राट ने आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रशासन दरबारात नेहमी आवाज काढत पिढीतांना न्याय देण्याची भूमिका पार पाडली असून साप्ताहिक कार्यसम्राट ने सामान्य माणसांचे प्रश्न प्रशासन दरबारात मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे साप्ताहिक कार्यसम्राट ने सोलापूर शहर जिल्ह्यात आदर्श वृत्तपत्र म्हणून आगळी वेगळी ओळख निर्माण केल्याचं देखील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी यावेळी यशवंत पवार यांचे कौतुक करून त्यांच्या लेखणीची दखल घेतली जात असल्याचे म्हटलं आहे
याप्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष तथा साप्ताहिक कार्यसम्राट चे संपादक यशवंत पवार पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी शहर सचिव अरुण सिडगिद्दी दैनिक लोकशाही मतदार चे युवा संपादक अक्षय बबलाद महाराष्ट्र पोलीस वार्ता चे संपादक अमोल कुलकर्णी अबीद तांबोळी हल्लाबोल चे संपादक शब्बीर शेख आदिल पटेल उपस्थित होते.
