सोलापूर (प्रतिनिधी) आयुक्तालयात फौजदार चावडी पोलीस ठाणे हददीत घरफोडीचा दिनांक २२/१९९ मोटारसायकल व ०१ घरफोडी चोरीच्या गुन्हा घडला होता. सदर बाबत पोलीस ठाण्यास सुचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख संजय क्षीरसागर व पथक भेट देवून गुन्हयाचा पुढील तपास सुरु केला होता तपासा पोलिसांनी घटनास्थळाचे आजूबाजीचे व रोडचे असे एकूण ५० सीसीटीव्ही कैमेरे तपासले तसेच इतर तांत्रीक तपास केला असता दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दोन इसम दोन मोटारसायकल वर चांदीचे दागीने विक्री करण्यासाठी मोहोळ वरून सोलापूर शहरात येत आहेत. त्यावरून डिबी पथकाचेसहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर व त्यांच्या पथकाने सापळा लावुन सदर दोन इसमांना ताब्यात घेताना आरोपीनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पथकाने त्यास शिताफीने पकडून ताब्यात घेतले. ताब्यात घेततलेले आरोपीत नामे १बंडू मधुकर पवार वय २८ वर्षे, व्यवसाय मजुरी रा. मु.पो. ढोकबाभळगांव ता. मोहोळ जि.सोलापूर २) उमेश प्रकाश काळे वय ३२ मजुरी रा. मलीकपेठ अनगर, ता. मोहोळ जि. सोलापूर यांना ताब्यात घेण्यात आले सदर आरोपीांकडे कौशल्यपूर्ण व शिताफिने तपास करून त्यांचे ताब्यातुन सदर गुन्हयातील चोरीस गेलेले २३.२८९ ग्रॅम सोन्याचे दागिने ४३१.७०० चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच चोरीस गेलेल्या दोन मोटारसायकली हस्तगत करून एकूण ०४.०३,०००/- रु चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच आरोपीताकडे अधिक तपास करता त्याने सोलापूर ग्रामीण हद्दीतील सोलापुर तालुका पोलीस ठाणे हद्दीत देखील घरफोडी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. तर आरोपत बंडु पवार हा सदर बाजार पोलीस ठाणेकडील खालील नमुद गुन्हयात देखील पाहीजे आरोपी असल्याचे निष्पन झाले आहे. अशाप्रकारे खालील नमुद गुन्हे उघडकीस आणले आहेत.
अ.क्र. पोलीस ठाणे
फौजदार चावडी पोलीस ठाणे, सोलापूर शहर
फोजदार चावडी पोलीस ठाणे, सोलापूर शहर
फोजदार चावडी पोलीस ठाणे, सोलापूर शहर
सोलापुर ग्रामीण मधील तालुका पोलीस ठाणे
सदर बाजार पोलीस ठाणे, सोलापूर शहर
गु.रं.नं. व कलम
६८८/२०२५ भा.न्या. संहिता २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे (मोटार सायकल)
६८९/२०२५ भा.न्या. संहिता २०२३ चे कलम ३०५,३३१ (४),३(५) प्रमाणे - (घरफोडी)
६९०/२०२५ भा.न्या. संहिता २०२३ कामम ३०३ (२) प्रमाणे (मोटार सायकल)
३८५/२०२५ भारतीय न्याय सोडत्ता २०२३ कलम ३०५ (A),३३१ (४) प्रमाणे (घरफोडी)
४०४/२०२५भारतीय न्याथ संहिता २०२३ ११८(१) ११५(२) प्रमाणे- (शरिराविषयी) इत्यादी गुन्हे उघडकीस आले आहेत
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त पोमण फौंजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत दुय्यम पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर पोह प्रवीण चुंगे पोह परीट पो ना. भीमदे पो कॉ दराडे बडूरे व्हटकर पुजारी चव्हाण खरटमल पाटील गायकवाड मोरे माने तुक्कूवाले सूरज सोनवलकर घाडगे शेख यांनी पार पाडली.
