सोलापूर (प्रतिनिधी ) पूर्वभाग हा गरीब कामगारांचा भाग या भागात विडी, यंत्रमाग,शिलाई, बांधकाम, खाजगी दुकानात काम करणारे कामगार, असे एकूण हातावर पोट असलेले कामगार मोठ्या प्रमाणात राहत असलेला भाग., हा भाग जेल रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो म्हणजे, जेलरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत बिनधास्तपणे अनेक अवैध धंदे चालतात. यात मटका धंदा अत्यंत जोरात चालतो. कामगार वर्ग विडी कामगार कुटुंबीयातील पुरुष दारूच्या व्यसनाधीनता बरोबर कमी वेळेत पैसा मिळवण्यासाठी सोपा मार्ग म्हणून मटक्याकडे वळला जात आहे., आणि वळणारच सोलापूर शहरातील जेलरोड पोलीस स्टेशन हद्दीत मटक्याच्या टपऱ्या मोठ्या प्रमाणात असून, प्रमुख मार्गावर खुलेआम पणे, मटका टपऱ्यात कोणता अंक येईल याचे छोटे छोटे बोर्ड देखील लावलेले दिसून येतात. पोलीस मुख्यालय, कर्णिक नगर, दत्तनगर, अशोक चौक, रविवार पेठ, पाच्छा पेठ न्यू पाच्छा पेठ, जेलरोड पोलीस स्टेशन परिसर या भागात मटका चालू असल्याचे दिसून येते. याबाबत अनेक सामाजिक संघटना तक्रारी करतात., पण काही उपयोग होत नाही. काही मटक्यावाले तर खुलेआमपणे तक्रार दाराला दमदाटी देखील करतात अशी ही माहिती मिळतं आहे जेलरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व इतर अधिकारी मटका टपऱ्यांकडे जाणीवपूर्वक बघून दुर्लक्ष करत असल्याचं दबक्या आवाजात बोललं जात आहे
एकंदरीत जेलरोड पोलीस ठाणे हद्दीत ठासून मटका व्यवसाय अतिशय जोरात सुरु असून मटका लावी जीवाला चटका या म्हणी चा प्रत्यय आता येऊ लागला असून अश्या मटका व्यवसायाला आशीर्वाद कोणाचा ? अभय कोणाचे? याच शोध कर्तव्य दक्ष पोलीस आयुक्त आयुक्त नक्कीच घेतील अशी आशा
पूर्व भागातील जनता व्यक्त करत असून एकंदरीत हा मटका व्यवसाय चांगल्या अधिकाऱ्यांना बदनाम केल्या शिवाय बंद होणार नाही असं ही पूर्व विभागातील नागरिकांमधून बोललं जात आहे.
