Type Here to Get Search Results !

सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांच्या वाहनाला टोल मधून सूट मिळणे बाबत पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर येथे लाक्षणिक उपोषण.




सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकार हा लोकशाही चा चौथा स्तंभ असून ऊन वारा पाऊस अंगावर झेलत सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारांना राजकीय सामाजिक शैक्षणिक त्याच बरोबर प्रशासना च्या बातम्या करण्यासाठी तालुका व विविध ग्रामीण भागातून जिल्ह्याच्या ठिकाणी चारचाकी वाहनातून प्रवास करावा लागतो जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यायल जिल्हा परिषद जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सिव्हिल हॉस्पिटल जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा उद्योग कार्यालय तसेच विविध महामंडळाचे कार्यालय अशी अनेक शासकीय कार्यालये जिल्ह्याच्या ठिकाणी असतात तसेच आमदार खासदार कॅबिनेटमंत्री राज्यमंत्री यांचे दौरे नियोजन बैठका सभा मेळावे बऱ्याच वेळा जिल्ह्याच्या ठिकाणी असल्याने वार्ताकंन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकारांना जिल्ह्याच्या ठिकाणी चार चाकी वाहनाने यावं लागत आहे ग्रामीण भागातील काही पत्रकारांकडे चार चाकी वाहने असल्याने  त्यांना नेहमीच सोलापूर ला वृत्त संकलन करण्यासाठी टोल भरून यावं लागतं आहे शासकीय वृत्तसंकलन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकार बांधव रोजच जिल्ह्याच्या ठिकाणी येत असल्याने टोल चा आर्थिक भुर्दंड पत्रकार बांधवाना सहन करावा लागत आहे याबाबत पत्रकार सुरक्षा समिती वतीने दिनांक 16/7/2025 रोजी सोलापूर चे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले होते त्याच बरोबर  ग्रामीण भागातील पत्रकारांच्या टोल विषयी मा विभागीय आयुक्त पुणे यांना देखील   पत्रकार सुरक्षा समिती च्या शिष्टमंडळाने दिनांक 12 / 9/ 2025 रोजी पुणे येथे भेटून निवेदन सादर केले होते.

 राज्य सरकार पत्रकारांच्या प्रश्नावर नेहमीच उदासीन भूमिका घेत असून पत्रकारांच्या प्रश्नावर निर्णय घेण्यास नेहमीच विलंब होत असल्याने अखेर पत्रकार सुरक्षा समितीने रस्त्यावर उतरण्याचा निर्धार करून सोलापूर येथे ग्रामीण भागातील पत्रकारांच्या चारचाकी वाहणांना टोल मधून सूट देण्या बाबत लाक्षणिक उपोषण करण्यात आले 

यावेळी पत्रकार सुरक्षा समिती वतीने 

*कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय रहात नाही*

*आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा*

*पत्रकार सुरक्षा समितीचा विजय असो*

*मुख्यमंत्री हाय हाय*

*परिवहन मंत्री हाय हाय*

अश्या घोषणांनी जिल्हा परिषद परिसर दणाणून सोडण्यात आला.

*पत्रकारांच्या चारचाकी वाहनाच्या टोलमुक्ती बाबत लवकर निर्णय घ्या अन्यथा परिवहन मंत्र्याच्या दालनासमोर आंदोलन*

प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांचा राज्यसरकार ला इशारा 

पत्रकारांच्या प्रश्नाबाबत राज्यसरकार नेहमीच उदासीन असून पत्रकारांच्या चालढकल करत असल्याचा आरोप करत पत्रकारांच्या टोल बाबत थेट परिवहन मंत्र्याच्या दालनसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला.

*पत्रकारांच्या चारचाकी टोल मुक्ती बाबत राज्यसरकार ने गांभीर्याने विचार करावा* -कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे 

पत्रकारांच्या चारचाकी वाहनाच्या टोल प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समितीच्या मागणी चा राज्यसरकार ने गांभीर्याने विचार करावा अशी मागणी कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी उपोषणवेळी केली असून  गांभीर्याने विचार करण्याचा सल्ला देखील राज्यसरकार ला दिला आहे.

  *पत्रकारांचे टोल बाबत सरकार ने वेळीच निर्णय घ्यायला हवा* जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे 

गेल्या आठ वर्षांपासून राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती अतिशय आक्रमक व प्रभावी पणे काम करत असून पत्रकारांचे प्रश्न राज्य सरकार कडे पोटतिडकीने मांडून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे पत्रकारांच्या चारचाकी वाहनाच्या टोल बाबत  राज्य सरकार ने वेळेत निर्णय घायला हवा असं प्रतिपादन पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे यावेळी केले आहे 




या प्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा सचिव अंबादास गज्जम जिल्हा संघटक सादिक शेख  सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी कार्याध्यक्ष राजू वग्गू सचिव अरुण सिडगिद्दी कार्यकारी शहर अध्यक्ष वसीमराजा बागवान समन्वयक लक्ष्मण सुरवसे दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद दैनिक अबतक चे संपादक प्रसाद जगताप गणेश दासरी अबीद तांबोळी सिद्धार्थ भडकुंबे श्रीनिवास पेद्दी महाराष्ट्र पोलीस वार्ता चे संपादक अमोल कुलकर्णी गणेश भालेराव जाकीर हुसेन हुंडेकरी सह पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.