Type Here to Get Search Results !

औषधांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी उपाययोजना आवश्यक : डॉ. जयकर. कॉलेज ऑफ फार्मसीत जागतिक फार्मासिस्ट दिन

 



सोलापूर (प्रतिनिधी ) जागतिक आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी

फार्मासिस्टची महत्त्वाची भूमिका आहे. या संकल्पनेला अनुसरून औषधांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे मत वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर यांनी व्यक्त केले. जुळे सोलापूर येथील कॉलेज ऑफ फार्मसी येथे जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक राजशेखर शिवदारे हे उपस्थित होते. कॉलेज ऑफ फार्मसी,

इंडियन फार्मासिटिकल असोसिएशन, सोलापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील शिवदारे शैक्षणिक संकुलातील सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जिल्ह्यातील फार्मसी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नामवंत नवरत्न फार्मासिस्टचा सन्मान करण्यात आला.

यावेळी संस्थेचे विश्वस्त प्रा. बी.व्ही. शेटे, सहसचिव अविनाश म्हेत्रे उपस्थित होते. प्रास्ताविक बी. सी. मणुरे यांनी केले. डॉ. वर्षा तेगेळी यांनी आभार मानले. सूत्रसंचालन मानसी दीडवणे आणि पूर्वा तिवाडी यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.