सोलापूर (प्रतिनिधी ) वाढत्या लोकसंख्येमुळे सोलापूर शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला असून शहराची लोक संख्या जवळपास १६ लाख असून सोलापूर शहर हे उत्सव प्रिय शहर असून वर्षाचे बारा महिने वेगवेगळ्या स्वरूपाचे सण उत्सव साजरे होत असतात त्याचबरोबर मिरवणूक देखील मोठ्या प्रमाणात सोलापूर शहरात निघतात तसेच राजकीय सभा मेळावे बैठका त्याचबरोबर मंत्री मंडळातील मंत्री महोदय नेहमीच सोलापूरला येत असतात या सर्व बाबींचा पोलीस प्रशासनावर प्रचंड ताण पडत असला तरी कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस प्रशासन कुठेही कमी पडलेले नाही. यापूर्वी सोलापूर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांच्या अडचणीचे निवारण होण्यासाठी त्याच बरोबर भांडण तंटे मारामाऱ्या रोखण्यासाठी व वेळीच पायबंध घालण्यासाठी सोलापूर शहरात जवळपास २३ पोलीस चौक्या उघडण्यात आल्या होत्या पण सध्या त्यातील बहुतेक पोलीस चौक्या कुलूपबंदच आहेत पोलीस चौकी आपल्या भागात असल्याने नागरिक देखील आपली तक्रार फिर्याद नोंदविण्यासाठी पोलीस चौकीत जायचे. आता परिस्थिती बदलली असून नागरिकांना आपल्या तक्रारी फिर्याद व अडचणी बाबत पोलीस स्टेशनला जावं लागत आहे सोलापूर शहरात दोन गटात हाणामारी दगडफेक चोरी घरफोडी अशा गुन्ह्यांचे प्रमाण वाढू लागले आ नागरिकांना मदतीसाठी अनेकदा डायल ११२ वर कॉल करावे लागत आहे सोलापूर शहराचा विस्तार वाढत्या लोकसंख्ये मुळे झपाटाने वाढला असून नागरिकांना आपल्या तक्रारी नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशन ला जाणं खूप लांब पडत आहे अनेक नगरवस्त्यापासून पोलीस स्टेशन चे अंतर मोठे असून पोलीस स्टेशन लांब असल्यामुळे नागरिकांना आपले तक्रार फिर्याद नोंदवण्यासाठी फार मोठी पायपीट करावी लागत आहे त्याचबरोबर वेळेत पोलिसांची मदत देखील मिळत नसल्याने नागरिकांना फार मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे याबाबत पत्रकार यशवंत पवार यांनी दिनांक 10/7/2025 रोजी मा पोलीस आयुक्त सोलापूर तसेच दिनांक 18/7/2025 रोजी सोलापूर चे जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र दिले होते परंतु सोलापूर शहरातल्या बंद केलेल् पोलीस चौक्या पुन्हा सुरू करण्या बाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याने सोलापूर शहरातील बंद असलेल्या पोलीस चौक्या पुन्हा सुरु करण्याबाबत पत्रकार यशवंत पवार यांनी विभागीय आयुक्त पुणे यांना निवेदन सादर केले असून बंद असलेल्या पोलीस चोक्या पुन्हा सुरु करणे बाबतीत पोलीस महासंचालक यांच्याशी पत्रव्यवहार करण्याची विनंती केली आहे.
