Type Here to Get Search Results !

तांदळात मृत साप प्रकरणी मर्जीतील परिमंडळ अधिकारी मोकाट मोदीतील रेशन दुकानदाराला परवाना रद्द करण्याची नोटीस अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार




सोलापूर (प्रतिनिधी ) मोदीमधील रेशन दुकान क्रमांक ड. 25 हे उत्तरभाग ग्राहक भांडार सोसायटीतर्फे चालविले जाते. जगजीवनराम झोपडपट्टीत राहणाऱ्या महादेवी भंडारे व नंदिनी जेगडेकर यांनी सप्टेंबरमध्ये घेतलेल्या तांदळात मृत साप आढळून होता. या बाबत समाज माध्यमातून मोठया प्रमाणात टीका टिप्पणी झाल्यानंतर निद्रिस्त असलेल्या अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना अखेर जाग आली अन चक्क मर्जीतील लाडक्या परिमंडळ अधिकाऱ्यांवर कारवाई न करता रेशन दुकानदाराला परवाना रद्द करण्याची नोटीस दिल्याने एकच खळबळ उडाली असून अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभारामुळे  सोलापूर शहर वासियांमधून संतापाची लाट उसळली असून  मर्जीतील परिमंडळ अधिकाऱ्यांना अभय देत असल्याची चर्चा आता चांगलीच रंगू लागली आहे

       *काय आहे प्रकरण*


मोदी परिसरातील रास्त भाव धान्य दुकानात गुरुवारी ग्राहकांना धान्य वाटपावेळी ड – २५ या रास्त भाव धान्य दुकानातील तांदूळ पोत्या मध्ये मृत सापाचे अवशेष सापडल्याने नागरिकात एकच खळबळ उडाली होती या प्रकरणाची अन्नधान्य वितरण कार्यालयाने  दखल घेत शुक्रवारी दुकानाचा पंचनामा केला व दुकान चालवणाऱ्या सोसायटीला परवाना रद्द करण्याबाबतची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

सोलापुरात काही दिवसापूर्वीच मोदी परिसरात दुषित पाण्यामुळे दोन  जणांना जीव गमववा लागला. आता पुन्हा वादग्रस्त असलेल्या रेशन प्रणालीतून चक्क तांदळात मृत सापाचे अवशेष सापडल्याने मोदी परिसरात नागरिकांत भयभीत वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत नागरिकांनी अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांना तक्रार केली असता, अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी पथक पाठवून त्या ठिकाणाची चौकशी व त्या तांदळाचे नमुने ताब्यात घेऊन त्याची तपासणी करण्याकरिता प्रयोगशाळेकडे पाठवून देण्यात आले. तसेच संबंधित दुकानातील धान्याचा पंचनामा करून त्या भागातील नागरिकांची चौकशी व जाबजबाब नोंदविण्यात आले. संबंधित दुकानदाराने याबाबत प्रतिक्रिया देताना धान्य गोडांऊनमधून ज्याप्रमाणे आले त्याप्रमाणे नागरिकांना वाटण्यात आले असे कळविले आहे. पण प्रत्यक्षात नियमाप्रमाणे रेशन दुकानात धान्य आल्यानंतर त्याचा पंचनामा करून ग्राहकांसाठी दर्शनी भागात असलेल्या काचेच्या भरणीत त्याचे सॅम्पल ठेवावे लागते.पण तसे न करता संबंधित दुकानदाराने याकडे डोळेझाक करून अतिशय निष्काळजीपणे धान्य वाटप केले आहे. याबाबत नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित दुकानदारास नोटीस बजावली असून 24 तासात त्याचे उत्तर देण्याबाबत कळविले आहे. एकंदरीत अतिशय दाट लोकवस्ती असलेल्या भागात असे निष्काळजीपणाने धान्य वाटप झालेल्या रेशन दुकानावर त्याच बरोबर परिमंडळ अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. इतक्या बेफिकीरपणाने रेशन मधील धान्य वाटप करून सामान्य लोकांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा प्रकार होत असल्याबाबतही नागरिकांनी चिंताजनक भावना व्यक्त केलेल्या आहेत.आता संबंधित दुकानदारावर तसेच मर्जितील  परिमंडळ अधिकाऱ्यांवर अन्नधान्य वितरण अधिकारी काय कारवाई  करणार?  याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे

    *कोण आहेत परिमंडळ अधिकारी*

 परिमंडळ कार्यालय ड विभागाचे


परिमंडळ अधिकारी म्हणून प्रफुल्ल नाईक हे कामकाज पहात असून परिमंडळ ड विभाग बरोबरच त्यांच्याकडे परिमंडळ कार्यालय क विभागाचा देखील परिमंडळ अधिकारी म्हणून अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी त्यांना पदभार दिल्याने प्रफुल्ल नाईक हे दोन परिमंडळ कार्यालयाचा पदभार सांभाळतात  ते अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे




 यांच्या खूप जवळचे  व मर्जीतील असल्याने त्यांना क विभागाचा परिमंडळ अधिकारी म्हणून पदभार दिल्याची खाजगीतून चर्चा होत आहे  ड विभागातील रेशन दुकानातील तांदळाच्या पोत्यात आढळून आलेल्या मृत सापाच्या अवशेष बाबत परिमंडळ अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई न करता  केवळ रेशन दुकानदाराला परवाना रद्द करण्याची नोटीस अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी बजावली असून   एकाच व्यक्ती ला दोन परिमंडळ कार्यालयाचा पदभार दिला असून प्रफुल्ल नाईक हे परिमंडळ कार्यालय क विभाग येथे आपल्या सोयी व मर्जीनुसार येत असल्याच्या गंभीर तक्रारी असून देखील त्यांच्याकडेच परिमंडळ अधिकारी म्हणून पदभार दिल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.