सोलापूर (प्रतिनिधी) रेशन दुकानदार अन् अधिकारी यांच्यात नेहमीच प्रशासकीय कामकाज होते. पुरवठा विभाग क्रिकेट स्पर्धेचा सामना मात्र दोघांसाठीही प्रचंड चुरशीचा आणि अटातटीचा होता.
पुरवठा व रेशन भवनच्या साखळी क्रिकेट सामन्यात माढ्यातील रेशन दुकानदारांनी पुरवठा व अन्नधान्य वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांवर मात केली. अधिकाऱ्यांनी सहा षटकात दिलेले ६६ धावांचे आव्हान माळ्यातील रेशन दुकानदार संघाने ५.५ घटकात पूर्ण करत या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. तर अधिकारी उपविजेते ठरले.
केंद्र शासन आदेशानुसार अतिवृष्टी संभावणामुळे जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांच्या धान्य महाराष्ट्रातील सर्व रास्त भाव दुकानातून एकत्रित वाटप करण्यात आले. त्यामुळे पहिल्यांदाच रास्त भाव धान्य दुकानदारांना सुट्टी मिळाली आहे.
*विक्रांत कदम मालिकावीर*
माढ्यातील रेशन दुकानदार संघातील विक्रांत कदम यांना मालिकावीर व बेस्ट बॅटस्मनचा सन्मान मिळाला. बेस्ट बाउलर म्हणून दीपक शिंदे, बेस्ट विकेट कीपर म्हणून यल्लाप्पा वारगंटी, बेस्ट क्षेत्ररक्षक म्हणून राजेश यमपुरे यांचा सन्मान झाला.
सुट्टीचा उपयोग दुकानदारांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व खिलाडूवृत्ती निर्माण व्हावी यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय व सोलापूर शहर अन्न धान्य वितरण अधिकारी कार्यालय आणि सोलापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार, केरोसीन विक्रेता असोसिएशनने तीन दिवसांचे क्रिकेट सामने आयोजित केले होते. सोलापुरातील कर्णिकनगर येथील स्व. लिंगराज वल्याळ मैदानावर या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेतील अंतिम सामना माढ्यातील रेशन दुकानदारांचा संघ विरुद्ध अधिकाऱ्यांचा
संघ यांच्यात झाला. या स्पर्धेचे तिसरे बक्षिस सोलापुरातील ब झोनच्या संघाला मिळाले तर उत्तेजनार्थ पारितोषिकाने दक्षिण सोलापूरच्या संघाचा सन्मान झाला.
या स्पर्धेत सर्व तालुक्यातील रेशन दुकानदार, पुरवठा अधिकारी वर्ग, परिमंडळ अ, ब, क, ड असे चारही झोन मिळून एकूण १६ संघाने सहभाग घेतला होता. या सामन्यांचे थेट प्रेक्षेपण यु-ट्युबवरही झाल्याने अनेकांना घरात बसून या सामन्यांचा आनंद लुटला.
स्पर्धेतील विजेत्यांना जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, अन्न धान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पेंटर, परिमंडळ अधिकारी राजेश यमपुरे, रेशन दुकानदार संघटनेचे राष्ट्रीय खजिनदार विजय गुप्ता, कोल्हापूरचे
जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील, प्रफुल नाईक, नंदकिशोर डोके, सचिव राजय्या कमटम, जिल्हा प्रमुख नितीन पेंटर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन आणि समालोचक म्हणून मनीष काळे यांनी काम पाहिले.
.jpg)
