Type Here to Get Search Results !

भ्रष्टाचाराचे आरोप करत स्वच्छता विभागातील सचिन जाधव यांच्यावर कारवाईची मागणी करत सुरज हुकूमसिंग राजपूत यांच्याकडून बेमुदत धरणे आंदोलन सुरू



 सोलापूर  (प्रतिनिधी)

जिल्हा परिषद मधील पाणी व स्वच्छता विभागातील भ्रष्ट कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांच्यावर कारवाई करा, असे भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांच्यावर कारवाईची मागणी नागरी सेवा व भ्रष्टाचार विरोधी कृती समितीचे सदस्य सुरज हुकूमसिंग राजपूत यांनी केली आहे. यासाठी त्यांनी जि. प. च्या पूनम गेटसमोर गेल्या तीन दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेत जलजीवन मिशन अंतर्गत कार्यरत असणारे सचिन जाधव यांच्यावर सुरज हुकूमसिंग राजपूत भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसे बॅनर त्यांनी जिल्हा परिषद येथील पूनम गेट येथील आंदोलनस्थळी लावले आहे. यामध्ये राजपूत यांनी म्हटले आहे की, सचिन जाधव यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्या भ्रष्टाचाराची खाते निहाय विशेष समिती नेमून चौकशी करावी, जाधव यांच्या विरोधात २०२१ ते आजतागायत आलेले सर्व तक्रारी अर्ज, माहिती अधिकारातील अर्ज यावर शासन स्तरावर झालेल्या निर्णयाचे खुलासे व्हावे, जाधव यांचे सर्व भाडेतत्वावर जिल्हा परिषदेच्या विविध विभागात लावलेल्या सर्व चारचाकी वाहने काढून टाकावीत, यासह जाधव यांनी स्वच्छता व जलजीवन मिशन अंतर्गत तालुका निहाय शौचालय बांधकाम व भिंती रंगविण्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार केला असून त्याची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी राजूपत यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.