सोलापूर (प्रतिनिधी) शासनाच्या ७ मे २०२१ च्या निर्णयानुसार पदोन्नतीच्या कोट्यातील निःशस्त्र सहायक पोलिस निरीक्षकांची पदे २५ मे २००४ च्या स्थितीनुसार सेवाज्येष्ठतेने भरण्यात येतात. २५ मे २००४ नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या निःशस्त्र पोलिस उपनिरीक्षकांना त्यांच्या मूळ सेवाज्येष्ठतेनुसार विभागीय समितीने निःशस्त्र सहायक पोलिस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यासाठी पात्रता तपासून २०२४-२५ ची निवडसूची तयार केली आहे. त्यानुसार ३४१ उपनिरीक्षकांना पदोन्नती देऊन त्यांच्या सोलापूर शहर- जिल्ह्यातील काही उपनिरीक्षकांना देखील पदोन्नती मिळाली आहे. त्यात महेश गळगटे (सोलापूर ग्रामीण आणि बदली पुणे शहर), अमृता राजपूत (सोलापूर शहर आणि बदली पुणे-पिंपरी चिंचवड), शुभांगी जगताप (पोलिस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर आणि बदली नागपूर शहर), नितीन शिंदे (सोलापूर शहर आणि बदली अमरावती शहर), संजीवनी व्हट्टे (सोलापूर शहर आणि बदली मुंबई शहर), सुधीर खारगे (सोलापूर ग्रामीण आणि बदली मुंबई
शहर), सूरज निंबाळकर (सोलापूर ग्रामीण आणि बदली मुंबई शहर), श्रीकांत जाधव (सोलापूर ग्रामीण आणि मुंबई शहर), विनय जाधव (सोलापूर शहर आणि नवी मुंबई), विक्रांत डिगे, नागाबाई गंपले (सोलापूर ग्रामीण आणि बदली मुंबई शहर), विनायक माहूरकर (सोलापूर ग्रामीण आणि बदली मुंबई शहर), करुणा चौगुले (सोलापूर शहर आणि बदली नागपूर परिक्षेत्र) अशा सोलापूर शहर-जिल्ह्यातील उपनिरीक्षकांचा पदोन्नतीत समावेश आहे. तर राजेश डाकेवाड, गजानन पाटील, कांचन कानडे यांची बदली पदोन्नतीने सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयात झाली आहे.
.jpg)