Type Here to Get Search Results !

आमदार गोपीचंद पडळकर यांचेवर कारवाई करून आमदारकी रद्द करण्याची ख्रिश्चन धर्मगुरूंचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

 



सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर शहरात सर्व समाजाचे व जातीधर्माचे बांधव प्रेमाने शांतीने व बंधूभावाने एकत्र राहतात. ही शांती व बंधूभाव लोप पावू नये याकरीता जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले

 सोलापूर शहर व जिल्ह्यातील ख्रिश्चन धर्मगुरु यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीररित्या ख्रिश्चन धर्मगुरूंचा सैराट करणाऱ्यास (जीवे मारणाऱ्यास) 11 लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे, त्यांच्या या चिथावणीखोर व बेकायदेशीर वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील व संपूर्ण देशातील ख्रिश्चन धर्मगुरूंच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे, त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेक धर्मगुरूंची हत्या होऊ शकते व सामाजीक तेढ निर्माण होऊ शकते.


राज्याचे मुख्यमंत्री व कायदासुव्यवस्थेचे प्रमुख (गृहमंत्री) या नात्याने ख्रिश्चन समाजाच्या धर्मगुरूच्या जीविताच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्यावरच आहे आमदार गोपीचंद पडळकर यांचेवर गंभीर चिथावणी दिल्याबद्दल FIR दाखल करून कठोर कारवाई करून त्यांची रद्द करण्याची मागणी केली आहे आमदार गोपीचंद पडळकर हे समाजविघातक कार्यासाठी गैरवापर करीत असल्याने व संविधान विरोधी कृत्यकरीत असल्यामुळे त्यांची आमदार की रद्द करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.

ख्रिश्चन समाज शांतिप्रिय समाज असल्याने आमच्यावर रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ देऊ नये ही अशी विनंती देखील निवेदनाच्या माध्यमातून केली आहे यावेळी पा 

निरंजन उजागरे  पा संजीव मोरे पा सैम क्रिलो पा 

याकोब नवगिरे पा बेंजामिन दुप्ते पा योहान कानेपागलू पा सतीश गडकरी पा जॉन दिनकर

पा. विनोद कोंडा पा प्राजक्त पन्हाळकर पा इब्राहिम गावित शांतप्पा जंगम पा भरत कवठेकर मधुकर बनसोडे विजय दुप्ते लॉरेन्स डोंगरे, जुगल हरपाल येलगेट्टी कुराडे सोनवणे सुहास बावडेकर सचिन पारवे जॉन क्षीरसागर चंद्रकांत ढाले सुहास बावडेकर इत्यादी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.