Type Here to Get Search Results !

माढ्याचे यू.एफ.जानराव यांना महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागाचा "डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार"जाहीर





माढा (प्रतिनिधी)- कुष्ठरोग्यांची सेवा करणारे माढा ता.सोलापूर येथील उत्तरेश्वर फरिद जानराव (यू.एफ.जानराव) यांना नुकताच महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर 

समाजभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे.याबाबतचे पत्र सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून यू.एफ. जानराव यांना मिळालेले आहे.या निवडी बद्दल यू.एफ.जानराव यांचे कौतुक पर अभिनंदन होऊ लागले आहे.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग पुरस्कार वितरण सोहळा हा मंगळवार दिनांक १० जून रोजी सकाळी ९ वाजता मुंबई येथे घेण्यात आलेला आहे.प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रमुख उपस्थिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची असणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट असणार आहेत.तसेच विशेष उपस्थिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि लोकसभा सदस्य अरविंद सावंत आदींची असणार आहे.कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची करणारे सोलापूर जिल्ह्यातील माढा या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ कुष्ठरोग तंत्रज्ञ यु.एफ.जानराव यांची ओळख परिचित आहेत.ते गेली अनेक वर्षापासून आरोग्य सेवेशी निगडीत कार्य करत आलेले आहेत.आरोग्य सेवेतून सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक चळवळीला गती देण्याचे काम त्यांनी केलेले आहे.ते सामाजिक वास्तव नेहमी परखड आणि निर्भीडपणे अगदी स्वतः रचलेल्या चारोळीतुनही मांडत असतात.आरोग्य सेवेसोबतच ते लोकांना जागृत करणाऱ्या चळवळीतून सुद्धा कार्य करत असतात.त्यांच्या कार्याची दखल म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून १५० हून अधिक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.अशा व्यक्तीमत्वाला आज महाराष्ट्र शासनाच्या न्याय विभागाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर झाल्याने विशेष आनंद हा माढ्या सह सोलापूर जिह्यातून तेच राज्यातील लोकांना कडून व्यक्त केला जात आहे.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून आलेल्या पत्रातून असे म्हटले आहे की,सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी सामाजिक न्याय विभागाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाते.यावर्षीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी आपली निवड झाल्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन ! आपले कार्य नेहमीच समाजाला दिशादर्शक ठरले असून आपण हाती घेतलेल्या कामामुळे समाजातील अनेक लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल झालेला आहे,याबद्दल आपले विशेष आभार !आपणास दिला जाणारा पुरस्कार हा केवळ एक सन्मान नसून आपण समाजातील उपेक्षित,वंचित व दुर्बल घटकांसाठी दिलेल्या आजपर्यंतच्या योगदानाचीही पावती आहे.यापुढेही आपले कार्य असेच अविरतपणे सुरु राहील व समाजातील युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल याची मला खात्री वाटते. पुनश्च एकदा आपले मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा ! अशा भावना व्यक्त करण्यात आलेल्या आहेत.

या पुरस्कारा बद्दल स्वतः यू.एफ.जानराव यांनी देखील विशेष समाधान व्यक्त केले आहे.यू.एफ.जानराव म्हणाले की,

सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासनाने माझ्या कुष्ठरुग्ण सेवेची आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन माझी "डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी निवड केल्याचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे.हा माझा सन्मान मी माझ्या मित्रांना, गुरुजणांना,आपतेष्ट,आणि कुष्ठरुग्ण या सर्वांचा आहे.असं मी मानतो.सदर पुरस्कार मिळण्यासाठी ज्यानी ज्यांनी मला प्रोत्साहन दिले त्या सर्वांचा मी आभारी आहे.खास आभार माझे नेते, प्रेरणास्थान नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्यामुळेच हे यश प्राप्त झाले आहे.असे देखील त्यांनी सांगितले.नक्कीच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने दिला जाणारा हा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचा पुरस्कार नक्कीच मोठा आहे.या पुरस्काराने काम करण्याची अधिक जबाबदारी वाढलेली असून हा पुरस्कार नक्कीच अजून काम करण्याची प्रेरणा  

यू.एफ.जानराव यांना देत राहील.असा विश्वास देखील लोकांना त्यांच्या कार्याबद्दल वाटत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.