Type Here to Get Search Results !

सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील नाविण्यपुर्ण उपक्रम कारंबा येथे पहाटअंतर्गत स्पर्धा परीक्षा करीता वाचनालयाचे उदघाटन




सोलापूर (प्रतिनिधी) अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे संकल्पेनेतुन आदिवासी पारधी समाजाच्या सामाजिक आर्थिक, शैक्षणिक विकास करण्याच्या उद्देशाने '' पहाट '' ü या नावीन्यपुर्ण उपक्रमांची सुरूवात केली आहे. 

        त्या अनुषंगाने पहाट उपक्रमांतर्गत अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी राहुल देशपांडे यांनी मौजे कारंबा येथे स्पर्धा परीक्षा वाचनालय सुरू करण्याचे ठरविले. 

        पोनि राहुल देशपांडे यांचे नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणे करीता वाचनालय सुरू केले असून एक महिन्यांच्या अथक प्रयत्ना नंतर कारंबा येथे वाचनालय तयार झाले. सदर वाचनालाया करीता कारंबा येथील विनायक सुतार यांनी हॉल उपलब्ध करून दिला. माऊली सेवा मित्र मंडळ, नागपूर व स्वर्गीय मीरा मनोहरराव व्याघ्र, नागपूर येथील सुहास खरे यांनी वाचनालया करीता पुस्तके उपलब्ध करून दिली मोहन मनोहर वाघ्र नागपूर यांनी त्यांच्या मातोश्री स्वर्गीय मिरा मनोहर व्याघ्र यांच्या स्मृतीप्रत्यत आर्थिक मदत केली 11.06.2025 रोजी '' पहाट अंतर्गत मौजे कारंबा ता.उत्तर सोलापूर येथे सुरू करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा वाचनालयाचे अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी उदघाटन केले आहे. 

.अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी स्पर्धा परीक्षाची तयारी कशी करावी या अनुषंगाने उपस्थित असलेल्या नागरिक व विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले आहे. सदर कार्यक्रमा करीता संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर, सोलापूर तालुका, पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी राहुल देशपांडे,.सोमनाथ कदम, सहायक पोलीस निरीक्षक महेश घोडके, पोलीस उपनिरीक्षक व सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार व विनायक सुतार गावातील नागरिक व विद्यार्थी व .सुहास खरे, माऊली सेवा मित्र मंडळ नागपूर व इतर सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.