Type Here to Get Search Results !

लोकशाही दिनात 33 तक्रारी प्राप्त




सोलापूर (प्रतिनिधी) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित लोकशाही दिनात जिल्ह्यातील 16 शासकीय कार्यालयात 33 तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. या तक्रारी संबंधित कार्यालयाकडे वर्ग करण्यात येत असून त्या कार्यालयांनी तात्काळ या तक्रारींचा निपटारा करावा. तसेच तक्रार करण्यासाठी येत असलेल्या नागरिकांशी सर्व संबंधित कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी चांगली वर्तणूक ठेवावी असे निर्देश महसूल उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी दिले.

            यावेळी  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुलोचना सोनवणे, जिल्हा कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्र संगीता खंदारे, पोलिस विभाग,आरोग्य विभाग, तहसिलदार, जिल्हा परिषद यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. 

लोकशाही दिनात जिल्हा परिषद सोलापूर 6, यू एल सी कार्यालय 1, पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण 5, जिल्हा अधिक्षक भुमि अभिलेख कार्यालय 2, तहसिलदार उत्तर सोलापूर कार्यालय 1, सार्वजनिक बांधकाम कार्यालय सोलापूर 2, तहसिलदार महसूल कार्यालय 2, उपजिल्हाधिकारी भुसंपादन 1, तहसिलदार माढा 1, पोलीस आयुक्त सोलापूर शहर कार्यालय 1, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय 3, तहसिलदार मोहोळ कार्यालय 3, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन कार्यालय 1, अधीक्षक, राज्य उप्तादन शुल्क विभाग सोलापूर 1, प्रबंधक जिल्हा अग्रणी बँक सोलापूर 2, तहसिलदार दक्षिण सोलापूर कार्यालय 1 अशा एकूण 33 तक्रारी अर्ज प्राप्त झालेल्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.