Type Here to Get Search Results !

सागर सिमेंट व एम के फाऊंडेशन वतीने 1 लाख वह्या वाटपाचा शुभारंभ संपन्न




सोलापूर (प्रतिनिधी) 

मागील अनेक वर्षांपासून सागर सिमेंट व  एम के फाऊंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी लाखो वह्यांचे वाटप करण्यात येत आहे, दरवर्षीप्रमाणे ह्या  २०२५-२६ शैक्षणिक वर्षाकरिता १ लाख वह्या वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ आज सागर सिमेंट कार्यालय विजापूर रोड सोलापूर येथे जिल्हा प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रातिनिधीक स्वरूपात वह्या वाटप करून शुभारंभ करण्यात आला.


दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ,  यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.



"गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवून आपण दरवर्षी वह्या वाटपाचे आयोजन करत असून, वही वाटपाचे हे कार्य काही विशिष्ट काळासाठीच चालू केले नसून, हे कार्य माझ्या हातून कायम जमेल त्याप्रमाणे  अखंड कायमच चालू ठेवण्याचा प्रयत्न करेन  व विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याच्या कार्यात माझा खारीचा वाटा कायमच असेल, ह्या सर्व कार्यात माझ्या कंपनी मॅनेजमेंट व वरिष्ठांचा भक्कम पाठिंबा राहिला आहे त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो" असे प्रतिपादन ह्यावेळी सागर सिमेंट महाराष्ट्र मुख्य व्यवस्थापक तथा एम के फाऊंडेशनचे संस्थापक श्री महादेव कोगनुरे यांनी केले.



कार्यक्रम प्रसंगी सागर सिमेंटचे सेल्स प्रमोटर श्री आनंद लोणावत, सागर सिमेंट चे डीलर श्री सोमनाथ हासाळे,श्री शिवलाल हरळेकर, श्री रमीज साबुनगर, श्री प्रकाश करपे, श्री मल्लेशी मंदोली, श्री रमेश कलशेट्टी, एस के बिराजदार प्रशालेचे मुख्याध्यपक श्री गुरुनाथ वांगीकर सर, श्री मोतीबाने सर, श्री काशिनाथ भातगुणकी, दक्षिण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष श्री पंचाक्षरी स्वामी, सोलापूर जिल्हा , समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष श्री नागेश बिराजदार, श्री मल्लिकार्जुन धारसंगे, श्री कलप्पा हंगरगी, श्री राजकुमार दिंडुरे, श्री बसवराज बाके, श्री सुरेश ढवले, श्री प्रकाश राचेट्टी सर, श्री अशोक बगले सर, श्री आप्पाशा हंचनाळ तसेच सागर सिमेंटचे अधिकारी, विविध शाळेचे विद्यार्थी, शिक्षक तसेच एम के फाउंडेशन चे पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बाबूगौडा बिराजदार सर यांनी केले तर आभार श्री शिवाजी राठोड यांनी मांनले 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.