सोलापूर (प्रतिनिधी) – पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार 2025 चा मान “हल्लाबोल न्यूज नेटवर्क”चे संपादक व युवा पत्रकार शब्बीर शेख यांना मिळाला आहे. त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाची दखल घेत समितीने त्यांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष गौरव केला.
हा भव्य सत्कार सोहळा पत्रकार सुरक्षा समितीचे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार, मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गणेश कारंडे, धाराशिव जिल्हा महिला अध्यक्ष सारिका चुंगे, सोलापूर जिल्हा संघटक सादिक शेख, जिल्हा सचिव अंबादास गज्जम, शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी (बीएस), कार्याध्यक्ष राजू वग्गू, समन्वयक लक्ष्मण सुरवसे, सचिव अरुण सिडगिद्दी, कार्यकारी शहर अध्यक्ष वसीमराजा बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.
यासोबतच दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद, पत्रकार कबीर तांडूरे, अजहर शेख, संभाजी गोसावी, सतीश गडकरी व अन्य पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
गेल्या आठ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती पत्रकारांच्या हक्कासाठी सक्रिय असून, प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा, ज्येष्ठ पत्रकारांसाठी समान पेन्शन, पत्रकार आरोग्य व विमा योजना, साप्ताहिक वृत्तपत्रांना जाहिरात धोरण, युट्यूब व पोर्टल पत्रकारांना शासकीय मान्यता, ग्रामीण पत्रकारांसाठी एसटीमध्ये मोफत प्रवास अशा विविध मागण्यांसाठी समिती सातत्याने आंदोलन, उपोषण, निवेदन व शासनाशी पत्रव्यवहार करत आहे. पत्रकारितेबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासत, समिती दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करत असते.
या पुरस्कारामुळे संपादक शब्बीर शेख यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न मांडण्याच्या त्यांच्या कार्याला यामुळे अधिक बळ मिळाले आहे.
