Type Here to Get Search Results !

लाखोंचा प्रतिबंधीत गुटखा-सुगंधी तंबाखू जप्त शहर गुन्हे शाखेची दमदार कारवाई.




सोलापूर (प्रतिनिधी ) येथील मुळेगांव रोडवरील अमर ज्योती नगरात अन्न औषध प्रशासनाच्या सहकार्याने शहर गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी, टाकलेल्या छाप्यात ६,७९,६२० रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखु जप्त केली. याप्रकरणी साजिद कय्युम नदाफ (रा. घ. नं. ३४८, उत्तर कसबा, पंजाब तालीम जवळ, सोलापूर) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आलंय.


गस्तीदरम्यान शहर गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड व त्यांच्या तपास पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तपास पथकाने अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून अमर ज्योती नगरात छापा टाकला. या छाप्यात अवैधरीत्या साठविलेला लाखोंचा प्रतिबंधीत गुटखा व सुगंधी तंबाखू हाती लागली.  


त्यात RMD पान मसाला, M सुगंधी तंबाखु, विमल पान मसाला, V-१ सुगंधी तंबाखु व विना लेबल सुगंधी तंबाखु असा ६,७९,६२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त कण्यात आला. त्यानुसार साजिद कय्युम नदाफ याचेविरूध्द, एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.सदरची कामगिरी अजित बोऱ्हाडे पोलीस उपायुक्त डॉ दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड वजीद पटेल संजय साळुंखे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.