सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटातील काही माजी नगरसेवकांनी अजित पवार गटात प्रवेश घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खूपच चर्चा झाली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कोण कुठे जातो?, कोण कोणाची भेट घेतोय?, याकडे सर्वच पक्षातील नेत्यांचे लक्ष लागून आहेत. यापुढेही अजित पवार गटात इन्कमिंग सुरू राहील. आणखी आठ ते दहा माजी नगरसेवक आमच्या पक्षात येतील, असा दावा अजित पवार गटातील स्थानिक नेते करतायेत. त्यामुळे भविष्यात अजित पवार गटात कोण कोण जातील, कोणाकडून तशी तयारी सुरू आहे. अजित पवार गटातील नेते कोणाशी संपर्क साधत आहेत?, याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागून आहे.
रोकठोक - यशवंत पवार ✒️
