सोलापूर : नऊ जूनपासून सोलापूर ते गोव्यासाठी विमान सेवा सुरू होत आहे. विमानसेवा लवकर सुरू होत नसल्याने सोलापूरकरांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विमानसेवा संदर्भात दिलेला शब्द पाळावा. लवकरात लवकर विमानसेवा सुरू करावी, यासाठी सोलापूर विकास मंच तसेच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. विमानसेवा संदर्भात सर्वत्र नाराजी पसरत असल्याने आता विमानसेवा सुरू करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे मंगळवारी अचानक दुपारी विमानसेवेची नवीन तारीख जाहीर झाली. आता लवकरच विमानसेवा सुरू होणार आहे. याचे श्रेय घेण्यासाठी आता सर्वजण पुढे येत आहे. त्यामुळे सोलापूरकर याचे श्रेय नक्की कुणाला देतील ? याची सध्या कुजबुज सुरू आहे.
रोकठोक - यशवंत पवार ✒️
