Type Here to Get Search Results !

हिरज येथे सहकार वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे यांची भेट रेशीम उदयोग बाबत शेतकऱ्यांची साधला संवाद





मोहोळ (अमर पवार ) दिनांक 17 /5 /25 रोजी उत्तर सोलापूर तालुका येथील हिरज बाजार पेठ येथे सहकार वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे यांनी भेट दिली व त्यावेळी आमदार सुभाष बापू देशमुख व जिल्ह्यातील रेशीम उद्योजक शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते यावेळी मंत्री महोदयांनी रेशीम बाजारपेठ चालू करणे व शेतकऱ्यांचे रखडलेले रेशीम उद्योगाचे अनुदान तरतूद करून देण्याबाबत आश्वासन दिले.  यावेळी रेशीम कार्यालयास कमी असलेला कर्मचारी वर्ग तात्काळ भरण्यात येथील असे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले..

       या वेळीं  हिरज येथील शेतकऱ्यांनी आपली रेशीम शेती विषयी अडचणी मांडल्या.या वेळीं मंत्री महोदयांनी येणाऱ्या 20 तारखेला मंत्रिमंडळात मीटिंग घेऊन  योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन दिले येत्या दोन महिन्यांमध्ये उत्तर सोलापूर  तालुक्यातील हिरज येथील रेशिम मार्केट चालू करून दिले जाईल असे देखील मंत्री महोदयांनी म्हटलं आहे. 

    यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी मंत्री असताना सोलापूर हिरज येथे रेशीम कार्यालयास जागा व व कार्यालय बांधकाम केले आहे व पुढील जबाबदारी मंत्री महोदयांकडे आहे असेही शेतकऱ्यांच्या वतीने सांगितले. तसेच सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मंत्री महोदय व आमदार सुभाष बापू देशमुख यांचा सत्कार केला..

   रेशीम कार्यालयाचे रेशीम अधिकारी विनीत पवार जोजन साहेब  गवंडे साहेब यांचेही काम चांगले आहे व ते शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करत आहेत आहेत

  मंत्री महोदयांना निवेदन देण्यासाठी करमाळा माळशिरस मोहोळ पंढरपूर सांगोला उत्तर सोलापूर अशा अनेक ठिकाणहून 200 हून शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.