Type Here to Get Search Results !

फौंजदार पोलीस ठाण्याची दमदार कामगिरी चेन स्नॅचिंग /जबरी चोरी करणाऱ्या परजिल्ह्यातील गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या.




सोलापूर (प्रतिनिधी ) शहरात मागील काही दिवसांपासून नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या जबरी चोरी व चैन स्नॅचिंग प्रकरणात सोलापूर शहर पोलिसांनी मोठा यश मिळवले आहे. परजिल्ह्यातील बीड येथून आलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या टोळीचा शोध घेत फौजदार चावडी पोलीस ठाणे व गुन्हे प्रकटीकरण पथकाने एकूण ५ गुन्ह्यांचा छडा लावून सुमारे ५,९६,५००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, दोन आरोपी फरार आहेत.

घटना कशी उघडकीस आली?

दिनांक ६ मे २०२५ रोजी सायंकाळी ८.१५ च्या सुमारास फिर्यादी सौ. रूपाली संतोष अहिरसंग या त्यांच्या मुलीसह स्कुटीवरून बाळे येथे जात असताना, मडकी वस्ती येथे लोखंडी पादचारी पुलाजवळ मागून आलेल्या दुचाकीवरील दोघांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेतले. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३०७/२०२५ नुसार भा. न्या. संहिता २०२३ चे कलम ३०९(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान पोलिसांनी या गुन्ह्याच्या अनुषंगाने इतर चार गुन्ह्यांशी साम्य साधणाऱ्या पद्धतीवर लक्ष केंद्रित केले. तांत्रिक तपास, मोबाईल टॉवर लोकेशन्स, तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे बीड जिल्ह्यातील दगडी शहाजानपूर, पांगरी रोड येथील टोळी सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले.

अटक आरोपींची नावे :

1. राहुल राजाराम गायकवाड (वय २०) 2. प्रकाश गंगाधर धोत्रे (वय २४)

3. अंबादास ऊर्फ अमोल अंकुश गायकवाड (वय २१)

(वरील तिघांना अटक)

4. सागर नवनाथ जाधव (वय २१)5. विकास रमेश जाधव (वय २२)

(हे दोघे फरार) उघडकीस आलेले गुन्हे :


1. फौजदार चावडी पो.ठा. गु.र.नं. ३०७/२०२५ – कलम ३०९(४), ३(५)


2. फौजदार चावडी पो.ठा. गु.र.नं. ३२१/२०२५ – कलम ३०९(४), ३(५)

3. विजापूर नाका पो.ठा. गु.र.नं. १९६/२०२५ – कलम ३०४(२)

4. सदर बाजार पो.ठा. गु.र.नं. ४१४/२०२५ – कलम ३०९(४), ३(५)

5. जेलरोड पो.ठा. गु.र.नं. २३५/२०२५ – कलम ३०४(२)

       जप्त मुद्देमाल :


७.५ तोळे सोन्याचे दागिने एक मोटार सायकल


      तीन मोबाईल फोन

एकूण किंमत – ₹५,९६,५००/-

पोलिसांची रणनीती व कारवाई :


चार दिवसांच्या तांत्रिक तपासानंतर व गुप्त बातमीदारांच्या मदतीने सोलापूर शहर पोलिसांनी या टोळीवर सापळा रचून अंबादास गायकवाड, राहुल गायकवाड व प्रकाश धोत्रे या तिघांना शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून पाचही गुन्ह्यांमधील मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. त्यांच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत आणखी दोन साथीदारांची माहिती मिळाली असून, पोलिसांचे शोधपथक त्यांचा शोध घेत आहे.


यशस्वी कारवाईमागे कोण?

या संपूर्ण कारवाईचे श्रेय जाते सोलापूर शहर पोलिस आयुक्त मा. एम. राजकुमार, उपआयुक्त मा. विजय कबाडे, सहाय्यक आयुक्त मा. प्रताप पोमण, तसेच फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी वपोनि अरविंद माने, दुपोनि तानाजी दराडे यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे प्रकटीकरण पथकाला.

पथकाचे प्रमुख स.पो.नि. शंकर धायगुडे, व त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये पोलीस कर्मचारी प्रविण चुंगे, बसवराज परीट, शिवानंद भिमदे, आयाज बागलकोटे, विनोद व्हटकर, कृष्णा बडुरे, विनोदकुमार पुजारी, अमोल खरटमल, ज्ञानेश्वर गायकवाड, शशिकांत दराडे, अर्जुन गायकवाड, तौसिफ शेख, अतिश पाटील, अजय चव्हाण, सचिन लवटे, सुधाकर माने व सुरज सोलवनगर यांचा उल्लेखनीय सहभाग होता.

सोलापूर पोलिसांची ही कामगिरी केवळ चैन स्नॅचिंगप्रमाणे वाढत्या गुन्ह्यांना आळा घालणारी ठरली नाही, तर परजिल्ह्यातून आलेल्या गुन्हेगारी टोळ्यांवर आघात करणारी ठरली आहे. यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा विश्वास निर्माण झाला असून, शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दिशेने ही मोठी पावले ठरली आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.