मंगरूळ (प्रतिनिधी ) मुस्लिम सेवा संघाच्या तुळजापूर तालुकाध्यक्षपदी मकबूल अलाउद्दीन तांबोळी यांची निवड करण्यात आली आहे
मुस्लिम सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष फिरोज मासुलदार यांनी नियुक्ती पत्र पाठवून सदरची निवड जाहीर केली आहे तण मन धन लावून सत्यनिष्ठतेने संघटना वाढीसाठी काम करावे व मुस्लिम बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील रहावे अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांना संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत
मकबूल तांबोळी यांनी यापूर्वीही अनेक संघटना यांची धुरा यशस्वीरित्या सांभाळली असून वेळप्रसंगी तीव्र आंदोलनही केले आहे व अनेक ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडली आहे त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन मुस्लिम सेवा संघाने सदरची निवड जाहीर केली आहे त्यांच्या या निवडीबद्दल तुळजापूर तालुक्यातुन अभिनंदन केले आहे.
