Type Here to Get Search Results !

कार्यसम्राट न्युज चे पत्रकार जैद बागवान यांचा सत्कार.




सोलापूर ( प्रतिनिधी ) पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून सोलापूर शहर जिल्हासह महाराष्ट्र राज्यातील 

राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय निमशासकीय प्रशासकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन कार्यसम्राट न्यूजने सोलापूर शहर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यात आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे समाजातील वंचित पीडित घटकासाठी कार्यसम्राट न्यूजने निरपेक्ष निर्भीड व सडेतोड लेखन करून अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी प्रशासन दरबारात कार्यसम्राट न्यूज च्या माध्यमातून आवाज  उठवून त्यांना न्याय देण्याची भूमिका आजपर्यंत पार पाडली आहे  कार्यसम्राट न्यूजचे तब्बल दोन लाख पंचाहत्तर हजार वाचक वर्ग असून पत्रकारिता  व्यवसाय नसून ती सामाजिक बांधिलकी असल्याने कार्यसम्राट न्यूजने आपली पत्रकारिता पणाला लावून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे कार्यसम्राट न्यूज च्या बातमीने अनेक नागरिकांचे प्रश्न सुटले असून सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी कार्यसम्राट न्यूज ने कधीच तडजोड केलेली नाही.

 कार्यसम्राट न्यूज च्या सोलापूर शहर प्रतिनिधी पदी युवा पत्रकार जैद बागवान यांची नुकतीच  नियुक्ती केली होती त्यांचा साप्ताहिक कार्यसम्राट चे जेष्ठ पत्रकार तथा पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी (बी एस) यांच्या हस्ते ओळख पत्र नियुक्ती पत्र शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

 यावेळी कार्यसम्राट न्यूज चे संपादक यशवंत पवार पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे संघटक सादिक शेख शहर कार्यकारी अध्यक्ष वसीमराजा बागवान नितीन साठे  दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद साप्ताहिक कार्यसम्राट चे राजू वग्गू  लक्ष्मण सुरवसे अमर पवार बंडू तोडकर सोहेब बागवान  सतीश गडकरी इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.