श्रीपुर (शंकर माने ) महाळुंग तालुका माळशिरस येथील डॉ सौरभ घोंगाने यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण झाला या यशाबद्दल त्याचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे सौरभ चे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण श्रीपुरच्या चंद्रशेखर विद्यालयातून तर उच्च शिक्षण पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातून पूर्ण केले त्यानंतर इस्लामपूर येथील शासकीय प्रकाश इन्स्टिट्यूट रिसर्च सेंटर वाळवा येथून त्यांनी एमबीबीएस शिक्षण पूर्ण केले डॉ सौरभ चे वडील हनुमंत घोंगाने यांचे श्रीपूर येथे पंक्चर काढण्याचे दुकान आहे सौरभच्या या यशाबद्दल माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी घोंगाने संजय कुमार घोंगाने शरद पौळ यांनी मानाचा फेटा बांधून व पुष्पहार घालून सत्कार केला आहे.
.jpg)