सोलापूर (प्रतिनिधी) . ०५/०४/२०२५ रोजी पोसई/मुकेश गायकवाड यांचे पथक पोलीस आयुक्तालयात गस्त करीत असताना, एक इसम चोरीची मोटार सायकल घेऊन न्यु धोंडीबा वस्ती, रामवाडी हॉस्पीटल रोड आतमध्ये बोळात थांबला असल्याची गोपनिय माहिती प्राप्त झाली. त्यामुळे, मिळालेल्या बातमीप्रमाणे मच्छींद्र उर्फ बापू गोरख गायकवाड वय ३२ वर्षे, व्यवसाय मजुरी, राहणार न्यु धोंडीबा वस्ती, रामवाडी, सोलापूर यास ताब्यात घेतले त्याचेकडे चौकशी केली असता, त्याने, त्याच्या घरासमोर लावलेल्या १) एक हिरो एच एफ डिलक्स कंपनीची मोटार सायकल विना नंबर प्लेट चेसीस क्र. MBLHA11ALE9H24239 इंजीन क्रं. MA11EJE9H09384 असा असलेली, २) एक हिरो एच एफ डिलक्स कंपनीची मोटार सायकल विना नंबर प्लेट चेसीस क्र. MBLHA11ATFQJ43787व इंजिन क्र. HA11EJFQJ47653 असा असलेली, ३) एक हिरो एच एफ डिलक्स कंपनीची मोटार सायकल विना नंबर प्लेट चेसीस क्र. MBLHAR236JHG05254 व इंजिन क्र. HA11ENJHG07499 असा असलेली ४) एक हिरो एच एफ डिलक्स कंपनीची मोटार सायकल विना नंबर प्लेट चेसीस क्र.MBLHA11AEE9D06797 व इंजिन क्र. HA11EF E9D03068 अशा चोरीच्या ०४ मोटार सायकली काढुन दिल्या. त्या मोटार सायकल बाबत, त्याच्याकडे चौकशी केली असता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुक २०२४ या वेळी रात्री एम्प्लायमेंट चौक सोलापूर येथुन ०१, रेल्वे स्टेशन पार्कीग येथुन ०१, फॉरेस्ट रेल्वे लाईन येथुन ०१, पारशी विहीर कुमठा नाका येथुन ०१ अशा एकुण ०४ मोटार सायकल चोरी केल्या असल्याचे त्याने माहिती दिली.
वर नमुद ०४ मोटार सायकलचे इंजिन व चेसिस नंबरची पडताळणी केली असता, सदर वाहनाबाबत सदर बझार पोलीस ठाणे व एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्हयातील ९०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन ०४ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सदरची कामगिरी . एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉ. दीपाली काळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, राजन माने,वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे यांचे मार्गदर्शनाखाली, पोसई / मुकेश गायकवाड, पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, वाजीद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड यांनी केली आहे.
