नवी मुंबई :
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्यासह कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर या तिघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.जी. पालदेवार यांनी दोषी ठरवले.
अश्विनी बिद्रे* हत्याकांड हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण असल्याचे मत नोंदवत न्या. पालदेवार यांनी या तिघांना ११ एप्रिल २०२५ रोजी शिक्षा ठोठावण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
या हत्या प्रकरणातील आरोपी राजू पाटील याची मात्र मे.न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
आरोपी
अभय कुरुंदकर याने
अश्विनी बिद्रे यांची निर्घृण हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून ते भाईंदरच्या खाडीत टाकून पुरावे नष्ट केल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपी स्वत: एक पोलीस अधिकारी असल्यामुळे त्याने आपल्या कौशल्याचा वापर करून सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र
*अभय कुरुंदकर* यानेच
*अश्विनी बिद्रे* यांची हत्या केल्याचे तसेच त्याने बनावट रेकॉर्ड तयार करून वरिष्ठांची दिशाभूल केल्याचे परिस्थितीजन्य पुराव्यातून स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे *कुरुंदकर* याच्याविरुद्ध हत्या, बनावट रेकॉर्ड तयार करणे व वरिष्ठांची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा सिद्ध झाल्याचे न्या. पालदेवार यांनी स्पष्ट केले.
*अश्विनी बिद्रे* यांची हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी *कुरुंदकर* याचा चालक
*कुंदन भंडारी* याने गोणी आणून त्यात मृतदेहाचे तुकडे भरले.
*कुरुंदकर* याचा मित्र
*महेश फळणीकर* ने गोणीत भरलेला *अश्विनी बिद्रे* चा मृतदेह भाईंदरच्या खाडीत टाकण्यास मदत केली.
तसेच भाईंदरच्या ज्या घरात *कुरुंदकर* ने *अश्विनी बिद्रे* चे तुकडे केले,
तेथे भिंतीवरील रक्ताचे डाग पुसण्यासाठी
*कुंदन भंडारी* ने ते रंगवून घेतले.
*अश्विनी बिद्रे* च्या शरीराचे तुकडे नेलेल्या गाडीची रंगरंगोटी करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
मे. न्यायालयाने *कुंदन भंडारी* व
*महेश फळणीकर* यांना पुरावा नष्ट करण्यास मदत केल्याबद्दल दोषी ठरवले.
