सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकार हा लोकशाही चा चौथा स्तंभ असून ऊन वारा पाऊस अंगावर झेलत सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारांना राजकीय सामाजिक शैक्षणिक त्याच बरोबर प्रशासना च्या बातम्या करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी नेहमीच मोटार सायकलवरून प्रवास करावा लागतो जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यायला जिल्हा परिषद जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा उद्योग कार्यालय तसेच विविध महामंडळाचे कार्यालय अशी अनेक शासकीय कार्यालये जिल्ह्याच्या ठिकाणी असतात तसेच आमदार खासदार मंत्री यांचे दौरे बैठका सभा मेळावे बऱ्याच वेळा जिल्ह्याच्या ठिकाणी असल्याने वार्ताकंन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकारांना जिल्ह्याच्या ठिकाणी यावं लागते ग्रामीण भागातील अनेक पत्रकार अतिशय अल्प मानधनावर काम करत असल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी मोटारसायकल वर येणे -जाणे परवडत नाही त्याच बरोबर खाजगी वाहन देखील आर्थिक परिस्थिती नसल्याने परवडत नाही शिवाय पेट्रोल चा खर्च देखील मोठा असल्याने अनेक पत्रकारांना वार्ताकंन करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी येणे जिकरीचे झाले आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी बातमी महत्वाची असल्याने पत्रकारांना यावे लागते अनेकदा ऊन वारा व पाऊसामुळे पत्रकारांना विविध अडचणीचा सामना करावा लागतो त्याच बरोबर तालुक्याच्या ठिकाणावरून जिल्ह्याच्या ठिकाणी मोटारसायकल वरून येण्याचा प्रवास देखील धोकादायक असतो त्यामुळे ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी मधून मोफत प्रवास मिळवा म्हणून पत्रकार सुरक्षा समिती वतीने सोलापूर चे जिल्हाधिकारी यांना दिनांक 6/3/2025 रोजी निवेदन सादर करण्यात आले होते या बाबत राज्य सरकार ने अद्याप निर्णय न घेतल्याने राज्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास मिळणेबाबत राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार सुरक्षा समिती वतीने बुधवार दिनांक 23/4/2025 रोजी पुनम गेट (जिल्हा परिषद) या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले राज्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांना एस टी बसमधून मोफत प्रवास बाबत राज्य सरकार ने निर्णय न घेतल्यास मंत्रालयसमोर पत्रकारांना घेऊन आंदोलन करण्याचा प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी यावेळी राज्य सरकार ला इशारा दिला
*कोण म्हणतंय देत नाही घेतल्या शिवाय रहात नाही*
*पत्रकारांना मोफत प्रवास मिळालाचं पाहिजे*
*पत्रकार सुरक्षा समितीचा विजय असो*
*आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा*
अश्या घोषणानी जिल्हा परिषद परिसर दणाणून सोडण्यात आला यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गणेश कारंडे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे कार्याध्यक्ष अतुल भडंगे संघटक सादिक शेख सचिव अंबादास गज्जम शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी (बी एस ) रंक्षदा स्वामी शहर अध्यक्ष (महिला विभाग ) शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू कार्यकारी शहर अध्यक्ष वसीमराजा बागवान समन्वयक लक्ष्मण सुरवसे शहर संघटक रिजवान शेख पंढरपूर तालुका अध्यक्ष दत्ता पाटील सचिव अरुण सिडगिद्दी दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद योगीनाथ स्वामी वैजिनाथ बिराजदार निरंजन बोधूल इम्तियाज अक्कलकोटकर आबीद तांबोळी फारुख तांबोळी मोहंमद तांबोळी शाहरुख तांबोळी कबीर तांडूरे इत्यादी पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.
.jpg)
