सोलापूर (प्रतिनिधी )गेली आठ वर्षापासून पत्रकार सुरक्षा समिती राज्यातील पत्रकारांच्या विविध प्रश्नावर आंदोलन उपोषण निवेदन व सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत आहे
पत्रकार सुरक्षा समिती वतीने ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना शासकीय यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती राज्यातील पत्रकारांसाठी घरकुल योजना विमा योजना आरोग्य योजना राज्यातील यूट्यूब व पोर्टलला शासकीय जाहिराती व मान्यता पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी साप्ताहिक साप्ताहिकाच्या वयोवृद्ध व जेष्ठ संपादकांना दरमहा वीस हजार रुपये पेन्शन यासह शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती सातत्याने पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
*पत्रकारांचे प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर घालणार*
फारुख मटके यांची पत्रकार सुरक्षा समितीला ग्वाही
पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास मिळावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे आंदोलन सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक विभाग राष्ट्रीय सरचिटणीस फारुक मटके यांनी पत्रकार सुरक्षा समितीच्या सुरु असलेल्या आंदोलनस्थळी भेट देऊन पत्रकार सुरक्षा समितीच्या मागण्या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे लवकरच भेट घेऊन पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे ठोस आश्वासन पत्रकार सुरक्षा समितीला दिले आहे यावेळी पत्रकार सुरक्षा समिती वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राष्ट्रीय सरचिटणीस फारुक मटके यांचा वाढदिवसाच्या निमित्त पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गणेश कारंडे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे कार्याध्यक्ष अतुल भडंगे संघटक सादीक शेख सचिव अंबादास गज्जम सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी (बी एस) कार्यकारी शहराध्यक्ष वसीमराजा बागवान शहराध्यक्ष महिला विभाग रक्षंदा स्वामी शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू शहर समन्वयक लक्ष्मण सुरवसे सचिव अरुण सिडगिद्दी शहर संघटक रिजवान शेख पंढरपूर तालुकाध्यक्ष दत्ताजी पाटील दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद इम्तियाज अक्कलकोटकर कबीर तांडूरे वैजिनाथ बिराजदार अमित तांबोळी फारुक तांबोळी मोहम्मद तांबोळी शाहरुख तांबोळी निरंजन बोधूल इत्यादी पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.
*पत्रकारांचे प्रश्न उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या कानावर घालून सोडवण्याचा प्रयत्न करणार जनसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस फारुख मटके यांचे पत्रकार सुरक्षा समितीला आश्वासन*
पत्रकार सुरक्षा समिती गेली आठ वर्षापासून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या संदर्भात वेगवेगळे स्वरूपाचे आंदोलन निवेदन व पत्रकार करत असून पत्रकार सुरक्षा समितीचा मागणी संदर्भात आपण लवकरच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन पत्रकार सुरक्षा समितीच्या मागण्या संदर्भात चर्चा करणार असल्याचे ठोस आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अल्पसंख्यांक विभाग राष्ट्रीय सरचिटणीस फारुक मटके यांनी पत्रकार सुरक्षा समितीला दिले आहे.

