सोलापूर (प्रतिनिधी ) येथील सोलापूर नामा 24 युट्युब साप्ताहिक यशसंघर्ष चे युवा संपादक सादिक शेख हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारीता एक चळवळ वसा ध्यास समजून समाजातील वंचित पीडित घटकाच्या न्याय हक्कासाठी आपली पत्रकारिता पणाला लावून अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त लोकांच्या समस्या प्रशासन दरबारात मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपली पत्रकारिता पणाला लावली असून पत्रकारिता क्षेत्रामध्ये युवा संपादक सादीक शेख यांनी एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली असून
सोलापूर नामा 24 युट्युब व साप्ताहिक यश संघर्ष च्या यशानंतर युवा संपादक सादिक शेख पोलीस वार्ताहर नावाने युट्युब चॅनल सुरु केलं असून त्याचे उदघाटन पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांच्या हस्ते सोलापूर येथे करण्यात आले
*सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी सादिक शेख यांची पत्रकारिता मोलाची* यशवंत पवार यांचे प्रतिपादन
युवा संपादक शेख जे पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा संघटक असून पत्रकारांच्या लढ्यात आजपर्यंत त्यांनी हिरीहिरीने भाग घेतला असून पत्रकारिता बरोबरच सामाजिक बांधिलकी जपत सोलापूर शहर जिल्ह्यातील विविध विषयावर निवेदनापासून आंदोलन उपोषण पर्यंत सादिक शेख यांनी प्रशासन दरबारात आपला आवाज उठून अनेकांना न्याय मिळवून दिला असे पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी पोलीस वार्ताहर युट्युब चॅनल च्या उदघाटन प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करून सर्वसामान्य माणसांच्या न्याय हक्कासाठी पोलीस वार्ताहर न्यूज चॅनल ने काम करावं अशी भावना देखील व्यक्त केली आहे
या उदघाटन प्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा सचिव अंबादास गज्जम सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी कार्यकारी शहर अध्यक्ष वसीमराजा बागवान कार्याध्यक्ष राजू वग्गू संपादक सादिक शेख सचिव अरुण सिडगिद्दी दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद कबीर तांडूरे सतीश गडकरी नरेश सब्बन नवीन रासकोंडा इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.
