सोलापूर(प्रतिनिधी ) सोलापूर जिल्हा परिषदेच्या कामांना माहिती तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. मालमत्ता नोंदी, मनुष्यबळ व्यवस्थापन, शंभर दिवस अभियान या कामांनी माहिती तंत्रज्ञानाची जोड देणेत आलेली पाहून विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कौतुकाची थाप टाकत सिईओ कुलदीप जंगम यांचे कामांचे कौतुक केले.
सोलापूर जिल्हा परिषदेने राबविलेल्या पुणेचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज सोलापूर जिल्हा परिषेदेस भेट देऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. सोलापूर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करणेत आले. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, शिक्षणाधिकारी कादर शेख कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी जिल्हा कृषी अधिकारी हरिदास हावळे, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव उपस्थित आहेत. प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी पंढरपूर तिर्थक्षेत्रा चे कामावर आधारित कॉफी टेवल बुक विभागीय आयुक्त पुंडकुलवार यांना चेट देऊन स्वागत केले.
*सिईओ कुलदीप जंगम योनी लाईव्ह संकेतस्थळावर जिल्हा परिषदेच्या म ालमत्ता नोंदी गुगल वरील स्थळांचे चित्रण, जिल्हा परिषदेच्या मनुष्यबळ व्यवस्थापन प्रणाली ची माहिती दिली*. समाज कल्याण विभाग अंतर्गत ८५०० अपंगानी विविध सुविधा सह घरपोच दिलेल्या सुविधांची माहिती दिली. जिल्हा समाज कल्याण विभागाने केलेल्या युआयडी कामाचे कौतुक केले.
.jpg)