Type Here to Get Search Results !

सार्वजनिक न्यासामार्फत नागरिकांना सुलभपणे सेवा मिळण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन




सोलापूर (प्रतिनिधी ) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय व धर्मादाय वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विश्वस्तांची कार्यशाळा  डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात पार पडली. या कार्यशाळेचा उद्देश धर्मादाय आयुक्त मुंबई अमोघ कलोती आणि धर्मादाय सह आयुक्त पुणे यांच्या निर्देशानुसार नागरिकांना सेवा सुलभ करण्याचा होता.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी धर्मादाय उप आयुक्त प्रविण कुंभोजकर, सहाय्यक धर्मादाय आयुक्त संजय पाईकराव, मानसशास्त्र तज्ञ डॉ. नितिन भोगे, जिल्हा अध्यक्ष खतीब वकील आणि अन्य विधितज्ञ उपस्थित होते.

उपआयुक्त कुंभोजकर यांनी कार्यशाळेचा हेतू स्पष्ट करताना सांगितले की, "मुख्यमंत्र्याच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यानुसार नागरीकांना मिळणाऱ्या सेवा सुलभ करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले आहे." त्यांनी कायदेविषक अडचणींवर मार्गदर्शन केले.

डॉ. नितिन भोगे यांनी मानवाच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. खतीब वकील यांनी विश्वस्तांचे अधिकार, कर्तव्ये आणि संस्थांचे संगोपन याबाबत माहिती दिली. ॲड. अंबादास रायनी आणि ॲड. खोले यांनी संबंधित कायद्यांवर मार्गदर्शन केले.

सहाय्यक धर्मादाय आयुक्त संजय पाईकराव यांनी दस्तऐवज अद्ययावत ठेवण्याबाबत सूचना दिल्या. कार्यशाळेच्या शेवटी प्रश्नोत्तर सत्र आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये विश्वस्तांच्या शंका समाधान करण्यात आल्या.


या कार्यशाळेतून विश्वस्तांना आवश्यक माहिती व कौशल्ये याविषयी सविस्तरपणे मार्गदर्शन करण्यात आले. त्यातून त्यांची कार्यक्षमता वाढून संस्थांचे व्यवस्थापन अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी चालना मिळणार आहे. तसेच अशा संस्थामार्फत सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या सेवा अत्यंत सुलभ रीतीने मिळतील.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.