Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत सोलापूर शहर पाणी पुरवठा योजनेसंदर्भात आढावा बैठक सोलापूर शहरासाठी समसमान पाणीपुरवठा योजनेला वेग..




मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवन येथे सोलापूर शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेबाबत आढावा बैठक घेतली. शहरातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी जलवितरण प्रणाली आणि वाढीव जलसाठवण प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला गती देण्याचे तसेच समसमान पाणीपुरवठ्यासाठी तातडीने आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.


मुख्यमंत्री यांनी सोलापूर शहरातील अपुरा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्यांनी पहिल्या टप्प्यात नवीन उच्चस्तरीय जलकुंभ उभारणे, 13 नवीन जलकुंभ बांधणे, नवीन जलवाहिन्या टाकणे, मोठ्या व्यासाच्या पाईपलाईन बसवणे आणि पाणीपुरवठा वाढवण्यासाठी पंपिंग क्षमता वाढवण्याचे काम त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले.


तसेच पाकणी येथे 66 द.ल.ली. क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. हे सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करून समांतर जलवाहिनी कार्यान्वित करावी, जेणेकरून सोलापूर शहरातील नागरिकांना वेळेवर आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळू शकेल.


बैठकीस आमदार देवेंद्र कोठे, अप्पर मुख्य सचिव, प्रधान तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.