जागतिक महिला दीनानिमित्त महिला पोलिसांचा सन्मान



सोलापूर (प्रतिनिधी ) जागतिक महिला 

महिला दिनानिमित्त लोकमंगल सहकारी बँकेच्यावतीने सोलापुरातील फौजदार चावडी पोलिस ठाण्यातील महिलांचा पोलिसांचा सन्मान करण्यात आला. ज्या महिला पोलिसांनी वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी केली त्यांचा सन्मान करण्यात आला. बँकेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या 'आई' योजनेची माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त प्रताप पोमण 


फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने, सहाय्यक पोलिस निरीक्षक सविता मोरे पाटील, बँकेच्या संचालिका सौ. शीतल कोकाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेशसिंह बायस यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्य कार्यकारी अधिकारी बायस म्हणाले, आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमंगल बँक प्रगती पथावर आहे. बँकेच्यावतीने फक्त आर्थिक व्यवहार न करता सामाजिक बांधिलकी जोपासली जाते. त्याचाच एक भाग म्हणजे.



जागतिक महिला दिनानिमित्त पोलिस प्रशासनातील क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान हा उपक्रम आहे. बँकेच्या वतीने सन्मानचिन्ह, भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, याप्रसंगी महिलांना बँकेच्या विविध कर्ज योजनेची माहिती, ठेवीची, रिकरिंग खात्यांची तसेच पर्यटन विभागाच्या " आई कर्ज योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली. प्रास्ताविक सौ. अनिता जगदाळे यांनी केले. बँकेच्या विविध वैशिष्ट्ये व कर्ज योजनांची माहिती व ठेवीची माहिती उपस्थित महिलांना दिली.

Post a Comment

0 Comments