बोंडले (प्रतिनिधी ) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संगणकशास्त्र संकुलाच्या वतीने 'डेक्स्टर इन्नोफेस्ट २०२४-२५' या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पानीव (ता. माळशिरस) येथील श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.
महाविद्यालयातील प्रीती काळे व सायली अडसर यांनी संशोधनात्मक व नावीन्यावर आधारित सादरीकरण केलेल्या प्रकल्पाला पोस्टर प्रेझेन्टेशन स्पर्धेत तृतीय क्रमांकाने यश मिळवले आहे. विजेत्या स्पर्धकांना फौंजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या हस्ते व कुलगुरू प्रा. डॉ
प्रकाश महानवर, व प्र. कुलगुरू लक्ष्मीकांत दामा यांच्या उपस्थितीत पारितोषिक देण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांना प्राध्यापक शोभा
घुले यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेसाठी आर. एम. पवार, एस. एस. शाकापूरे, यू. एस. दोडमिसे व के. एस. काझी यांनी परिक्षांचे
काम पाहिले.
संशोधनात्मक स्वख्याच्या असलेल्या या स्पर्धेत सोलापूर, सांगोला, मोहोळ, बार्शी, पानीव, अकलूज व पंढरपूर येथील महाविद्यालयातील संगणकशाख या विषयातील २९८ पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी प्रोग्रॅमिंग, पेपर व पोस्टर प्रेझेन्टेशनसाठी सहभाग नोंदविला होता. या विद्यार्थ्यांना संस्थेच्या कमिटी सदस्यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, मार्गदर्शक श्रीलेखा पाटील, उपाध्यक्ष करण पाटील, सचिव अॅड. अभिषेक पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी भाऊसो वणवे, प्राचार्य राजेंद्र डावकरे यांच्यासह महाविद्यालयाच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

