सोलापूर (प्रतिनिधी ) गेल्या आठ वर्षापासून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र वतीने महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या संदर्भात वेगवेगळे स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना आरोग्य योजना राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांबाबत स्वतंत्र सेवानिवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी राज्यातील यूट्यूब व पोर्टलला शासकीय मान्यता राज्यातील वृत्तपत्राच्या ज्येष्ठ संपादकांना दरमहा 20 हजार रुपये पेन्शन यासह राज्यातील पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाणबाबत पत्रकार सुरक्षा समिती नेहमीच आक्रमक भूमिका घेऊन राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.
पत्रकार सुरक्षा समितीचे विद्यमान जिल्हाध्यक्ष तथा सारा न्यूज नेटवर्क चे संपादक पत्रकारांच्या लढ्यात अग्रस्थानी असलेले अडचणीत असलेल्या पत्रकारांना योग्य ते मार्गदर्शन करून पत्रकारांचे प्रश्न पोटतिडकीने सोडवणाऱ्या त्याच बरोबर पत्रकारांच्या प्रत्येक लढ्यात सहभागी होऊन पत्रकारांचे प्रश्न प्रशासन दरबारात आंदोलन उपोषण निवेदन करून पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी नेहमीच अग्रेसर असणाऱ्या पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष राम हुंडारे यांचा वाढदिवसानिमित्त सोलापूर येथे सत्कार करण्यात आला यावेळी प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष कलीम शेख जिल्हा सचिव अंबादास गज्जम शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू वैभव राऊत दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद कबीर तांडूरे इम्रान आत्तार राजकुमार शिंदे राजाभाऊ पवार चंद्रशेखर निम्मल इत्यादी उपस्थित होते.

.jpg)