Type Here to Get Search Results !

सागर सिमेंटच्या महाराष्ट्रातील वितरकांचा अल्माटी (कझाकस्तान) विदेश दौरा संपन्न.



सिमेंट क्षेत्रात अल्पावधीतच नावाजलेल्या सागर सिमेंट लिमिटेड कंपनीच्या महाराष्ट्रातील वितरकांसाठी अल्माटी (कझाकस्तान) येथे 11 ते 15 मार्च 2025 या कालावधीत विदेश दौऱ्याचे कंपनीचे महाराष्ट्र हेड श्री महादेव कोगनूरे साहेब ह्यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले होते. दौरा पूर्ण करून आज सर्व वितरकांचे व अधिकाऱ्यांचे हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल़े.

मध्य आशियातील सर्वात लांब अश्या बर्फाळ पर्वतरांगेच्या पायथ्याशी नैसर्गिक सौंदर्यानी संपन्न असलेल्या अल्माटी (कझाकस्तान) येथील पाच दिवसीय दौऱ्यात वितरकांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या.

आपल्या कंपनीचा एक अविभाज्य व महत्त्वाचा भाग असणार्‍या वितरकांसाठी रोजच्या धावपळीच्या जीवनातून थोडीशी विश्रांती मिळावी ह्या हेतूने सागर सिमेंट लिमिटेड कंपनीच्या वतीने

महाराष्ट्रातील वितरकांसाठी विदेश दौरा आयोजित केल्याबद्दल सागर सीमेंट मॅनेजमेंट व कंपनीचे मार्केटिंग हेड श्री राजेश सिंग साहेब ह्यांचे श्री महादेव कोगनूरे साहेब यांनी मनापासून आभार मानले व भविष्यात वितरकांसाठी विविध योजना राबवणार असल्याचे देखील ह्यावेळेस सांगितले...

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.