फलटण( प्रतिनिधी ) पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून सोलापूर शहर जिल्हासह महाराष्ट्र राज्यातील
राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय निमशासकीय प्रशासकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन कार्यसम्राट न्यूजने सोलापूर शहर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यात आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे समाजातील वंचित पीडित घटकासाठी कार्यसम्राट न्यूजने निरपेक्ष निर्भीड व सडेतोड लेखन करून अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी प्रशासन दरबारात कार्यसम्राट न्यूज च्या माध्यमातून आवाज उठवून त्यांना न्याय देण्याची भूमिका आजपर्यंत पार पाडली आहे कार्यसम्राट न्यूजचे तब्बल दोन लाख पंचाहत्तर हजार वाचक वर्ग असून पत्रकारिता व्यवसाय नसून ती सामाजिक बांधिलकी असल्याने कार्यसम्राट न्यूजने आपली पत्रकारिता पणाला लावून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे कार्यसम्राट न्यूज च्या बातमीने अनेक नागरिकांचे प्रश्न सुटले असून सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी कार्यसम्राट न्यूज ने कधीच तडजोड केलेली नाही.
कार्यसम्राट न्यूज च्या फलटण तालुका प्रतिनिधी पदी युवा पत्रकार विक्रम वाघमारे व मनोज गायकवाड यांची फेर नियुक्ती केली होती फलटण येथे युवा पत्रकार विक्रम वाघमारे व मनोज गायकवाड यांना कार्यसम्राट चे नियुक्ती पत्र ओळख पत्र शाल व पुष्पहार घालून संपादक यशवंत पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी राजाभाऊ पवार उपस्थित होते.
