Type Here to Get Search Results !

अजित दादा ओबीसी च्या हिताचे घेत असलेले निर्णय समाजापर्यंत पोहचवा



सोलापूर (प्रतिनिधी ) राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.श्री.सुनीलजी तटकरे यांच्या सूचनेनुसार राज्यभर राबविण्यात येत असलेल्या पदाधिकारी संपर्क अभियानांतर्गत सोलापूर येथे महानगर व ग्रामीण ओबीसी विभागाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची व्यापक बैठक संपन्न झाली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.अजितदादा पवार ओबीसी प्रवर्गाच्या हिताचे घेत असलेले निर्णय व भूमिका ओबीसी समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम ओबीसी विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी करावे तसेच ओबीसीतील संख्येने अतिशय अल्प असलेल्या जात घटकांपर्यंत पोहोचून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन कल्याण आखाडे  यांनी बोलताना केले.


यावेळी आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार होते तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव .आनंद चंदनशिवे, प्रदेश सचिव शशिकांत कांबळे, ओबीसी विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष ऍड.सचिन औटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान यांच्यासह ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.संतोष भाकरे, बशीरभाई शेख, ऍड.सलीमभाई नदाफ, प्रदेश सरचिटणीस .संतोष राजगुरू,बसवराज बगले, गंगाधरराव भांगे, सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष .मोतीराम चव्हाण, महानगर जिल्हाध्यक्ष अनिल छत्रबंद, कार्याध्यक्ष अय्युब शेख, गुरव समाजाचे नेते .गणेश पुजारी, जेष्ठ नेते .हेमंत चौधरी, आनंद मुस्तारे, अल्पसंख्याक अध्यक्ष आमेर शेख, सहकार अध्यक्ष भास्कर आडकी, वाहतूक अध्यक्ष इरफान शेख, वैद्यकीय विभागाचे  श्री.बसू कोळी, कामगारचे अध्यक्ष मार्तंड शिंगारे, सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे, शहर सरचिटणीस श्री.प्रमोद भोसले आदी प्रमुख मान्यवरांसह ओबीसी विभागाच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


याप्रसंगी सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने संतोष  पवार व जुबेरभाई बागवान यांनी मानाचा फेटा बांधून व केक कापून  कल्याण आखाडे यांचा वाढदिवस साजरा केला. ओबीसी विभागाच्या ग्रामीण व महानगर कार्यकारणीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना कल्याण आखाडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या बैठकीला ग्रामीण व महानगर ओबीसी विभागाच्या पदाधिऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे नियोजन ओबीसी शहर जिल्हा अध्यक्ष अनिल छत्र बंद यांनी केले होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.