सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकारिता बरोबर रेशीम उद्योग करणारे पत्रकार अमर पवार यांना पत्रकार सुरक्षा समिती 2025 चा आदर्श रेशीम रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे अमर पवार हे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशीम उद्योग बाबत माहिती व सल्ला देऊन महिना 50 ते 60 हजार रुपये रेशीम उद्योग मधून मिळवून देऊन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा त्याच बरोबर रेशीम उद्योग बाबत वेळोवेळी शेतकऱ्यांना माहिती देऊन शेतकऱ्यांना रेशीम उद्योग चे महत्व पटवून देऊन सोलापूर जिल्ह्यात रेशीम उद्योगाला चालना मिळावी म्हणून नेहमीच प्रयत्न करत असतात अमर पवार हे बेगमपुर (मोहोळ ) येथील रहिवाशी असून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशीम उत्पादन बाबत नेहमीच मार्गदर्शन व माहिती देऊन शेती बरोबर पुरक व्यवसाय म्हणून रेशीम उत्पादन त्याचे आर्थिक फायदे या बाबत नेहमीच शेतकऱ्यांना रेशीम लागवड उद्योग बाबत प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांनी आपला आर्थिक विकास करून घ्यावा यासाठी प्रयत्न करत आहेत अमर पवार यांच्या रेशीम उद्योग बाबत करत असलेल्या कार्याची दखल घेऊन पत्रकार सुरक्षा समिती चे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी यांनी युवा पत्रकार अमर पवार यांना राज्यस्तरीय रेशीम रत्न पुरस्कार जाहीर केला आहे.
