सोलापूर (प्रतिनिधी ), शुक्राचार्य मारुती शेंडेकर हे वडदेगांव तालुका मोहोळ येथील रहिवाशी असून गेली चार वर्षांपासून डाळींब लागवड व संगोपन त्याच बरोबर विक्री करत असून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डाळिंब लागवड व विक्री चा व्यवसाय बाबत नेहमीच मार्गदर्शन व सल्ला देऊन शेतकऱ्यांचा आर्थिक विकास बाबत प्रयत्न करत असून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डाळिंब लागवडी पासून होणारे फायदे तसेच पर राज्यात डाळिंब चा सप्लाय केल्याने वर्षाला एक ते दोन लाख रुपये कमिशन च्या माध्यमातून मिळण्यासाठी शुक्राचार्य शेंडेकर नेहमीच शेतकऱ्यांना माहिती देऊन शेतकऱ्यांचा विकास घडवून आणत आहेत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विविध राज्यात डाळिंब ची विक्री व त्यातून होणारा फायदा डाळिंब लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना समजावून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी नेहमीच अग्रेसर असल्याने पत्रकार सुरक्षा समितीने त्यांच्या कार्याची दखल घेत शुक्राचार्य शेंडेकर यांना पत्रकार सुरक्षा समिती 2025 चा राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कार जाहीर केल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे सरचिटणीस बंडू तोडकर उपाध्यक्ष अमर पवार सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी (बी एस ) यांनी जाहीर केला आहे
.jpg)