पत्रकार दिनानिमित्त वळसंग पोलिस ठाण्याच्या वतीने पत्रकारांचा सन्मान.



वळसंग (प्रतिनिधी ) पत्रकार दिनानिमित्त शनिवारी सायंकाळी वळसंग पोलीस ठाण्यात पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वळसंग पोलीस ठाण्याचे सपोनि अनिल सनगल्ले, पोलीस उपनिरीक्षक म्हाळप्पा सुरवसे, मल्लिनाथ बंदीछोडे, अशोक पाटील यांनी सर्व पत्रकारांना फेटा बांधून गुलाब पुष्प, वही पेन देऊन सन्मानित करण्यात आले व शुभेच्छा दिल्या.सपोनि अनिल सनगल्ले म्हणाले की,पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ नसून पहिलाच स्तंभ आहे. आजचा डिजिटल माध्यमाच्या युगात आजही पत्रकारिता प्रभावी ठरत आहे. पत्रकार आपल्या लेखणीतून अनेक परिवर्तन घडवून आणतात. लोकांचे प्रश्न मांडण्याचे तसेच प्रशासन, लोकप्रतिनिधीच्या कामावर लक्ष ठेवण्याचे महत्त्वाचे काम करतात, तसेच पत्रकार बातमी देऊन थांबत नाही, तर त्या बातमीचा पाठपुरावा करून प्रश्न सोडवितात.एखादी समस्या मार्गी लावण्यासाठी वेळप्रसंगी पत्रकार संघटनाकडून निवेदन देऊन चळवळी व आंदोलनही करतात असे देखील ते म्हणाले.

यावेळी संचारचे दक्षिण सोलापूर तालुका इंडियन प्रेस क्लबचे अध्यक्ष इराण्णा गंचिनगोटे पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष ,यशवंत पवार, साम मराठी चे जिल्हा प्रतिनिधी विश्वभूषण लिमये,बिसलसिद्ध काळे,दिनकर नारायणकर,लोकप्रधान न्यूज चॅनल चे अर्जुन चव्हाण  नारायण घंटे यांच्यासह   वळसंग पोलिस ठाण्याचे कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments