साप्ताहिक कार्यसम्राट चे जेष्ठ पत्रकार अरुण सिडगिद्दी यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार.




सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून सोलापूर शहरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवून समाजातील घडणाऱ्या चांगल्या व वाईट घटना निरपेक्ष निर्भीड व परखड पणे साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राच्या माध्यमातून जेष्ठ पत्रकार  तथा पत्रकार सुरक्षा समितीचे शहर सचिव अरुण सिडगिद्दी यांनी  जनतेसमोर मांडून समाजातील वंचित पिढीत अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त व अडचणीत असलेल्या  रंजलेल्या गांजलेल्या शोषित समाजाचे प्रश्न प्रशासन दरबारात पोटतिडकीने मांडून त्यांना त्यांचे मूलभूत अधिकार व मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या विकासासाठी आपली लेखणी झिजवली असून  सोलापूर शहरातील जनतेच्या व्यथा वेदना व अडचणी ची अचूक माहिती घेऊन त्यांच्या अडचणी दूर करण्याचा  प्रामाणिक पणे प्रयत्न जेष्ठ पत्रकार अरुण सिडगिद्दी यांनी केला आहे . जेष्ठ पत्रकार अरुण सिडगिद्दी यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार सुरक्षा समिती वतीने शाल पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे संघटक सादिक शेख कार्याध्यक्ष अतुल भडंगे सचिव अंबादास गज्जम जिल्हा उपाध्यक्ष कलीम शेख सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी (बी एस ) कार्यकारी अध्यक्ष वसीमराजा बागवान शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू समन्वयक लक्ष्मण सुरवसे उपाध्यक्ष रविकांत रणदिवे दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद  इम्रान आत्तार इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments